Dream Astrology: झोपच उडाली! रात्री पडलेल्या अशा भीतीदायक स्वप्नांकडे दुर्लक्ष नको; अशुभ घडण्याचे संकेत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dream Astrology: झोपेत पडणारी स्वप्ने ही केवळ कल्पना नसून आपल्या सुप्त मनाचा संदेश असतात. भारतीय ज्योतिष आणि स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्न आपल्या भविष्यातील सुख-दुःखाच्या घटनांचे पूर्वसंकेत देते, असे मानले जाते. काही स्वप्ने आपल्याला येणाऱ्या संकटांपासून सावध करतात, तर काही अपार धन-संपत्तीची आनंदाची बातमी घेऊन येतात.
advertisement
1/6

स्वप्न शास्त्रामध्ये अशा स्वप्नांबद्दल आणि त्यांच्या संकेतांबद्दल सांगितलं आहे, ती कदाचित भीतीदायक वाटू शकतात, परंतु त्यांचे परिणाम सुखद असू शकतात. स्वप्न शास्त्रात सांगितलेल्या अशा काही विशेष स्वप्नांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
2/6
उंचावरून पडण्याचे स्वप्न - अनेकदा लोक स्वतःला डोंगर, इमारत किंवा आकाशातून पडताना स्वप्नात पाहतात आणि अचानक दचकून जागे होतात. स्वप्न शास्त्रानुसार, हे स्वप्न प्रत्यक्षात अशुभ संकेत असते. भविष्यातील अडचणी अडथळे, मान-प्रतिष्ठेची हानी किंवा अचानक होणाऱ्या धनहानीकडे निर्देश करते. तुम्हाला असे स्वप्न पडले, तर तुमच्या करिअर आणि गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये विशेष काळजी घ्या.
advertisement
3/6
स्वप्नात साप पाहणे सामान्यतः भीतीदायक वाटते, परंतु याचे परिणाम बरेच सकारात्मक असू शकतात. स्वप्न शास्त्रानुसार, जर झोपेत तुम्हाला सुंदर किंवा रंगीत साप दिसले, तर समजा तुमच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार आहे. जर तुम्ही स्वतःला साप पकडताना पाहत असाल, तर हे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या समस्यांवर विजय मिळवाल आणि तुमची दीर्घकाळापासून सुरू असलेली आर्थिक ओढाताण लवकरच संपेल.
advertisement
4/6
विवाहाची स्वप्ने -विवाहाशी संबंधित स्वप्नांचे दोन पैलू असतात. जर तुम्ही स्वप्नात स्वतःला आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकताना पाहत असाल, तर हे तुमच्या यशस्वी वैवाहिक भविष्याचे संकेत आहे. याउलट, जर तुम्ही स्वप्नात लग्न तुटताना पाहत असाल, तर हे एखाद्या कौटुंबिक वादाचे किंवा मानसिक तणावाचे संकेत असू शकते.
advertisement
5/6
सोन्याचे दागिने पाहणे -भविष्य पुराणानुसार, एखादी व्यक्ती स्वप्नात स्वतःला सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली किंवा दागिने घालताना पाहत असेल, तर हे भाग्योदयाचे लक्षण आहे. याचा अर्थ तुम्हाला नजीकच्या भविष्यात अचानक धनलाभ होऊ शकतो किंवा तुमच्या करिअरमध्ये एखादी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. हे स्वप्न समृद्धी आणि सामाजिक पद-प्रतिष्ठा वाढवण्यासाठी देखील खास मानले जाते.
advertisement
6/6
वाईट स्वप्न पडल्यास काय करावे?स्वप्न शास्त्रानुसार, जर एखादे भीतीदायक किंवा अशुभ स्वप्न पडले, तर सकाळी उठून आपल्या इष्ट देवाचे स्मरण करावे किंवा शिवपिंडीला जल अर्पण करावे. मान्यतेनुसार, वाईट स्वप्नांबद्दल इतरांना सांगितल्याने त्यांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो, तर शुभ स्वप्ने कोणालाही न सांगता गुप्त ठेवावीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Dream Astrology: झोपच उडाली! रात्री पडलेल्या अशा भीतीदायक स्वप्नांकडे दुर्लक्ष नको; अशुभ घडण्याचे संकेत