TRENDING:

Navpancham Yog: सुखाची लाईफ..! बुध-गुरुचा नवपंचम योग 5 राशींना लकी, आनंदाला उरणार नाही पारावार

Last Updated:
Navpancham Yog: वैदिक ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार दिनांक 9 मार्च 2026 रोजी बुध आणि गुरु एकमेकांपासून 120 अंशांच्या अंतरावर असतील. या स्थितीमुळे या दोन ग्रहांमध्ये नवपंचम योग निर्माण होईल. बुध-गुरुचा हा नवपंचम योग कोणत्या 5 राशींसाठी फायदेशीर ठरेल त्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/6
सुखाची लाईफ..! बुध-गुरुचा नवपंचम योग 5 राशींना लकी, आनंदाला उरणार नाही पारावार
वैदिक ज्योतिषात ग्रहांची युती आणि दृष्टी यांचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्योतिषीय गणनेनुसार 9 मार्च 2026 रोजी बुद्धीची देवता बुध आणि देवांचे गुरु बृहस्पती यांच्यात नवपंचम योग तयार होत आहे. हा योग या 5 राशींसाठी शुभ आणि मंगलकारी मानला जात आहे.
advertisement
2/6
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक आघाडीवर मोठे यश घेऊन येईल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर या काळात ते परत मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात नवीन गुंतवणुकीतून मोठा नफा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची आनंदाची बातमी मिळू शकते.
advertisement
3/6
मिथुन - बुध हा मिथुन राशीचा स्वामी असल्याने गुरुसोबतचा हा त्रिकोण संबंध तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणेल. विद्यार्थी आणि संशोधन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असेल. तुमची तर्कशक्ती मजबूत होईल, ज्यामुळे तुम्ही कार्यक्षेत्रात अचूक निर्णय घेऊ शकाल. व्यवसायात वाढ आणि चोहोबाजूंनी धनलाभाचे योग आहेत.
advertisement
4/6
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग सामाजिक मान-प्रतिष्ठेत वाढ करणारा ठरेल. जे लोक कुटुंब विस्ताराचा विचार करत आहेत, त्यांना शुभ बातमी मिळू शकते. या काळात एकापेक्षा जास्त मार्गांनी धन आगमन होईल आणि जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल.
advertisement
5/6
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्याचे द्वार उघडणारा ठरेल. या काळात तुमची अध्यात्मातील रुची वाढेल आणि लांब पल्ल्याच्या सुखद प्रवासाचे योग येतील. जोडीदारासोबत सुरू असलेले जुने मतभेद दूर होतील आणि परस्पर ताळमेळ सुधारेल.
advertisement
6/6
धनू - धनू राशीचा स्वामी स्वतः गुरु बृहस्पती आहे. बुधाचा अनुकूल प्रभाव तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल. या काळात नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जर तुम्हाला नवीन स्टार्टअप सुरू करायचा असेल, तर 9 मार्चनंतरचा काळ अत्यंत अनुकूल राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Navpancham Yog: सुखाची लाईफ..! बुध-गुरुचा नवपंचम योग 5 राशींना लकी, आनंदाला उरणार नाही पारावार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल