TRENDING:

कुंभ राशीसाठी गुडन्यूज, पण 'या' 2 राशींच्या लोकांची सुटका नाहीच, शनीच्या साडेसातीमुळे 2027 पर्यंत होणार हाल!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा असा ग्रह आहे जो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. जेव्हा शनी एखाद्या राशीच्या मागील राशीत, स्वतःच्या राशीत आणि पुढील राशीत भ्रमण करतो, तेव्हा त्या काळाला 'साडेसाती' म्हटले जाते. नवीन वर्ष 2026 मध्ये शनीच्या हालचालींमुळे काही राशींना दिलासा मिळणार आहे, तर काहींसाठी संघर्षाचा काळ सुरू राहणार आहे.
advertisement
1/7
कुंभ राशीसाठी गुडन्यूज, पण 'या' राशींची सुटका नाहीच, 2027 पर्यंत होणार हाल!
ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा असा ग्रह आहे जो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. जेव्हा शनी एखाद्या राशीच्या मागील राशीत, स्वतःच्या राशीत आणि पुढील राशीत भ्रमण करतो, तेव्हा त्या काळाला 'साडेसाती' म्हटले जाते. नवीन वर्ष 2026 मध्ये शनीच्या हालचालींमुळे काही राशींना दिलासा मिळणार आहे, तर काहींसाठी संघर्षाचा काळ सुरू राहणार आहे.
advertisement
2/7
यंदा 2026 मध्ये शनी आपली रास बदलणार नसल्यामुळे साडेसातीतून कोणाचीही पूर्णपणे सुटका होणार नाही, मात्र कुंभ राशीसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.
advertisement
3/7
कुंभ रास - साडेसातीचा अंतिम टप्पा: 2026 मध्ये कुंभ राशीच्या जातकांसाठी साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू असेल. हा टप्पा साडेसातीच्या समाप्तीकडे जाणारा असतो. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून जो मानसिक आणि आर्थिक त्रास तुम्ही सहन केला आहे, त्यातून हळूहळू सुटका होण्यास सुरुवात होईल. मात्र, शनी उतरताना तुमची परीक्षा घेऊ शकतो, त्यामुळे कामात दिरंगाई करू नका.
advertisement
4/7
मीन रास - साडेसातीचा मध्य काळ : मीन राशीसाठी 2026 हे वर्ष साडेसातीच्या दुसऱ्या आणि सर्वात कठीण टप्प्याचे असेल. शनी या काळात तुमच्या स्वतःच्या राशीत विराजमान आहे. यामुळे मानसिक तणाव, आरोग्याच्या तक्रारी आणि कामात अडथळे येऊ शकतात. आर्थिक बाबतीत विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
advertisement
5/7
मेष रास - साडेसातीचा पहिला टप्पा: मेष राशीच्या लोकांसाठी 2026 मध्ये साडेसातीचा पहिला टप्पा सुरू असेल. या काळात तुम्हाला नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल. प्रवासात अडथळे आणि कौटुंबिक वादाची शक्यता आहे. नवीन वर्षात मोठे आर्थिक निर्णय घेताना दहावेळा विचार करावा.
advertisement
6/7
शनीचा ढैय्या कोणत्या राशींवर? 2026 मध्ये सिंह आणि धनु या दोन राशींवर शनीच्या ढैय्याचा प्रभाव राहील. ढैय्या अडीच वर्षांचा असतो. सिंह राशीला आठव्या शनीचा आणि धनु राशीला चौथ्या शनीचा प्रभाव जाणवेल. यामुळे कामात व्यत्यय आणि मालमत्तेचे प्रश्न उद्भवू शकतात.
advertisement
7/7
साडेसाती कधी संपणार? साडेसाती पूर्णपणे संपण्यासाठी शनीचे राशी परिवर्तन होणे आवश्यक असते. 29 मार्च 2025 रोजी शनीने मीन राशीत प्रवेश केला असून तो जून 2027 पर्यंत याच राशीत राहील. त्यामुळे 2027 मध्ये जेव्हा शनी मेष राशीत प्रवेश करेल, तेव्हा खऱ्या अर्थाने कुंभ राशीची साडेसाती पूर्णपणे संपेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
कुंभ राशीसाठी गुडन्यूज, पण 'या' 2 राशींच्या लोकांची सुटका नाहीच, शनीच्या साडेसातीमुळे 2027 पर्यंत होणार हाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल