TRENDING:

Virat Kohli : सरत्या वर्षाला निरोप देताना कोहलीचा 'विराट' पराक्रम,दिग्गजाला टाकलं मागे

Last Updated:
2025 हे वर्ष आज संपणार आहे. या सरत्या वर्षाला निरोप देताना टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने मोठा पराक्रम केला आहे.
advertisement
1/7
सरत्या वर्षाला निरोप देताना कोहलीचा 'विराट' पराक्रम,दिग्गजाला टाकलं मागे
2025 हे वर्ष आज संपणार आहे. या सरत्या वर्षाला निरोप देताना टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने मोठा पराक्रम केला आहे.
advertisement
2/7
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या मालिकेत विराट कोहलीने शानदार कामगिरी केली होता. या विराट कोहलीने तीन सामन्यात दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावत 302 धावा केल्या होत्या.
advertisement
3/7
विराटने ही कामगिरी करून वनडे क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. विराट कोहली या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अशाप्रकारे दुसरे स्थान गाठून त्याने मोठा विक्रम केला आहे.
advertisement
4/7
अशाप्रकारे विराट कोहलीने विवियन रिचर्ड्सचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीच्या कारकिर्दीत ही 10 वी वेळ आहे जेव्हा त्याने आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल दोन स्थानांवर वर्ष संपवले आहे.
advertisement
5/7
विराट कोहलीने 2017, 2018, 2019 आणि 2020 मध्ये नंबर वन फलंदाज म्हणून वर्ष संपवले होते. तर 2013, 2014,2015, 2016, 2021 आणि 2025 मध्येही तो दुसऱ्या स्थानावर राहिला.
advertisement
6/7
अशाप्रकारे त्याने वेस्ट इंडिजचे महान विवियन रिचर्ड्स यांचा जुना विक्रम मोडला.रिचर्ड्स त्याच्या कारकिर्दीत 9 वेळा टॉप टूमध्ये होते.आतापर्यंत, फलंदाजांमध्ये कोहली आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांच्याकडे संयुक्तपणे हा विक्रम होता.
advertisement
7/7
दरम्यान 37 वर्षीय विराट कोहलीने आतापर्यंत 308 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 58.5 च्या सरासरीने 14,557 धावा केल्या आहेत. कोहलीने एकदिवसीय सामन्यात 53 शतके आणि 76 अर्धशतके केली आहेत. कोहलीपेक्षा एकदिवसीय सामन्यात कोणीही जास्त शतके केलेली नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Virat Kohli : सरत्या वर्षाला निरोप देताना कोहलीचा 'विराट' पराक्रम,दिग्गजाला टाकलं मागे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल