मंगळाची कुंभ राशीत एन्ट्री! शनीमुळे हाल सोसणाऱ्या 'या' राशीला लागणार जॅकपॉट, कोणाचं नशीब चमकणार?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 07:27 वाजता ग्रहांचा सेनापती मंगळाने शनीच्या मालकीच्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे.
advertisement
1/13

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 07:27 वाजता ग्रहांचा सेनापती मंगळाने शनीच्या मालकीच्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. कुंभ राशीत आधीच शनी, राहू आणि शुक्र यांची मांदियाळी आहे. विशेष म्हणजे, मंगळ आणि शनीची ही युती आणि राहूसोबतचा 'अंगारक योग' काही राशींसाठी आव्हानात्मक असला, तरी एका राशीसाठी हा काळ 'जॅकपॉट' ठरणार आहे.
advertisement
2/13
मेष: मंगळ हा तुमचा राशीस्वामी असून तो अकराव्या भावात प्रवेश करत आहे. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा नफा मिळेल. मित्र आणि मोठ्या भावांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमच्या महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागतील.
advertisement
3/13
वृषभ: मंगळाचे हे भ्रमण वृषभ राशीपासून दहाव्या घरात होईल. त्यांच्यासोबत सूर्य, बुध आणि राहू देखील आहेत. त्यामुळे, तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळविण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. मेहनती व्यक्तींसाठी हा काळ चांगला असेल.
advertisement
4/13
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे गोचर भाग्याच्या ठिकाणी होत आहे. शनीच्या ढैय्येचा प्रभाव असूनही मंगळ तुम्हाला प्रगतीसाठी प्रचंड ऊर्जा देईल. रखडलेली कामे अचानक पूर्ण होतील. परदेशातून धनलाभ होण्याचे योग असून व्यवसायात मोठी गुंतवणूक यशस्वी ठरेल. हा काळ तुमच्यासाठी खरोखरच एखाद्या जॅकपॉटपेक्षा कमी नाही.
advertisement
5/13
कर्क: कर्क राशीवर शनीची ढैय्या सुरू आहे आणि मंगळ अष्टम भावात गोचर करत आहे. हा काळ तुमच्यासाठी 'मिश्र' स्वरूपाचा असेल. अचानक धनप्राप्तीचे योग आहेत, मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. गुप्त शत्रूंवर तुम्ही मात कराल.
advertisement
6/13
सिंह: मंगळ सिंह राशीपासून सातव्या घरात भ्रमण करत आहे. सिंह राशीसाठी हे भ्रमण खूप अनुकूल मानले जाते. सिंह राशीवर शनीचाही प्रभाव आहे. तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या कठोर परिश्रमाचे उत्कृष्ट परिणाम मिळतील. तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीसाठी सुवर्ण संधी देखील मिळतील. व्यवसाय मालकांना नफा आणि चांगली कमाई अनुभवायला मिळेल.
advertisement
7/13
कन्या: कन्या राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी मतभेद टाळावेत. सध्या मोठी गुंतवणूक किंवा जोखीम घेणे टाळणे चांगले. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे.
advertisement
8/13
तूळ: तूळ राशीसाठी हे संक्रमण चांगले आहे. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी शक्य आहेत. प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न उत्तम असेल, परंतु त्याचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
advertisement
9/13
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या चौथ्या भावात मंगळाचे आगमन होत आहे. शनीची ढैय्या असूनही मंगळ तुमच्यासाठी सुख-सुविधा वाढवणारा ठरेल. नवीन घर किंवा जमीन खरेदीचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. आईकडून किंवा मातृपक्षाकडून धनलाभ मिळण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
10/13
धनु: हे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी धैर्य आणि प्रयत्नांना चालना देणारे असेल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी आहेत. कौटुंबिक बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असेल. तसेच वाईट संगतींपासून लांब राहणे फायद्याचे ठरेल.
advertisement
11/13
मकर: मकर राशीच्या लोकांनी ची कामे वेळेवर पूर्ण करावीत. त्यांच्या कारकिर्दीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, परंतु घाई टाळणे महत्वाचे आहे. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवल्याने नातेसंबंध सुधारतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना त्यांचे प्रयत्न सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
12/13
कुंभ: तुमच्याच राशीत ही युती होत असल्याने तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल. तुम्ही प्रत्येक काम पूर्ण आत्मविश्वासाने कराल. नेतृत्व करण्याची संधी मिळेल. मात्र, राहू-मंगळाच्या युतीमुळे रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
advertisement
13/13
मीन: या वेळी मीन राशीसाठी खर्च वाढू शकतो. तुमचे बजेट संतुलित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असेल. कामाच्या ठिकाणी संघर्ष टाळा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
मंगळाची कुंभ राशीत एन्ट्री! शनीमुळे हाल सोसणाऱ्या 'या' राशीला लागणार जॅकपॉट, कोणाचं नशीब चमकणार?