TRENDING:

Astrology: एक दोन नव्हे 5 ग्रहांची कुंभ राशीत बैठक; कर्क, वृश्चिकसह 6 राशींना त्रासाचा काळ, ताकही फुंकून..!

Last Updated:
Five Planet In Aquarius Negative Impact: फेब्रुवारी महिन्यात शनीची राशी असलेल्या कुंभेमध्ये एकापाठोपाठ एक अनेक मोठ्या ग्रहांचा गोळाबेरीज होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीमध्ये बुध, राहू, सूर्य, मंगळ आणि शुक्र या ग्रहांची युती होणार आहे. एकाच राशीत पाच ग्रह विराजमान असतील, तर काही काळासाठी चंद्र देखील याच राशीतून संचार करणार आहे. 3 फेब्रुवारीला बुध, 6 फेब्रुवारीला शुक्र, 13 फेब्रुवारीला सूर्य आणि 23 फेब्रुवारीला मंगळ ग्रह मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करत आहेत. तर राहू या राशीत 18 मे 2025 पासून स्थिरावलेला आहे. एकाच राशीत 5 ग्रह असल्याने वृषभ, तूळ यांसह 6 राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या राशींनी काही काळासाठी प्रत्येक कामात सतर्कता बाळगली पाहिजे. जाणून घेऊया या ग्रहांच्या प्रभावामुळे कोणत्या राशींच्या जीवनात काय चढ-उतार येऊ शकतात...
advertisement
1/6
एक दोन नव्हे 5 ग्रहांची कुंभ राशीत बैठक; कर्क, वृश्चिकसह 6 राशींना त्रासाचा काळ
मेष - राहू, सूर्य, मंगळ यांसह पाच ग्रहांचे एकाच राशीत असणे मेष राशीच्या लोकांसाठी चढ-उताराची स्थिती निर्माण करू शकते. या काळात तुमच्यात आळस वाढू शकतो, ज्यामुळे तुमची कामे पुढे ढकलली जाऊ शकतात आणि जीवनाच्या इतर क्षेत्रांतही अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आळस सोडून मेहनतीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जास्त प्रवास केल्याने तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे व्यापाऱ्यांनी या काळात कोणताही माल उधार देण्याचे टाळावे, अन्यथा अडचणी येऊ शकतात.
advertisement
2/6
वृषभ - सूर्य, राहू, शुक्र यांसह पाच ग्रहांच्या युतीमुळे वृषभ राशीच्या कौटुंबिक जीवनात सुख-शांतीची कमतरता भासेल आणि पैसे वाचवणे कठीण होऊ शकते. जर तुम्ही कौटुंबिक व्यवसाय करत असाल, तर नुकसानीचे योग आहेत आणि तुमच्या अनेक योजना अपूर्ण राहताना दिसतील. फेब्रुवारीमध्ये नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमध्ये सावधगिरीने काम करावे आणि कोणत्याही प्रकारच्या राजकारणापासून दूर राहावे. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या काही महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात, पण हे केवळ काही काळासाठी असेल.
advertisement
3/6
कर्क - मंगळ, राहू, सूर्य यांसह पाच ग्रहांचे एकाच राशीत असणे कर्क राशीच्या लोकांसाठी संमिश्र फलदायी ठरेल. लांब पल्ल्याचे प्रवास आणि धार्मिक सहलींचे योग येतील, पण त्यात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. जर तुम्ही परदेश प्रवासाचे किंवा तिथे स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर वारंवार प्रयत्न करूनही निराशा पदरी पडू शकते. नोकरी करणाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात आपल्या कामावर पूर्ण लक्ष द्यावे, अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे त्रासाला सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल.
advertisement
4/6
कन्या - राहू, मंगळ, शुक्र यांसह पाच ग्रहांच्या युतीमुळे कन्या राशीच्या लोकांनी स्वतःसोबतच कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. जर तुम्ही प्रवासाला जात असाल, तर आपल्या सामानाची विशेष काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांमुळे काही समस्या जाणवू शकतात, पण परिस्थिती तुमच्या नियंत्रणातच असेल. याशिवाय, तुम्ही गरजेपेक्षा जास्त आत्मविश्वासू होऊ शकता, ज्यामुळे सुरू असलेली कामे थांबू शकतात. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे फेब्रुवारीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीपासून दूर राहावे, अन्यथा विनाकारण पैसा अडकू शकतो.
advertisement
5/6
तूळ - मंगळ, शुक्र, राहू यांसह पाच ग्रहांच्या अशुभ दृष्टीमुळे तूळ राशीच्या लोकांना अनेक बाबतीत अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या काळात धार्मिक श्रद्धा मजबूत होईल, ज्यामुळे तुम्हाला अनेक बाबतीत दिलासा मिळेल. या राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांनी ऑफिसमध्ये इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ कामावर लक्ष द्यावे, अन्यथा अडचणी वाढू शकतात. जर तुम्ही गुंतवणूक करत असाल, तर एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या, अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
वृश्चिक - राहू, शुक्र, मंगळ ग्रहांच्या एकाच राशीतील वास्तव्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. सुरू असलेली कामे मध्येच अडकू शकतात आणि विनाकारण होणाऱ्या खर्चामुळे कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. फेब्रुवारीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. धार्मिक कार्यांमधील रुची आणि चांगले आध्यात्मिक अनुभव येऊनही तुम्हाला आर्थिक समस्या जाणवू शकतात. आरोग्यात बिघाड झाल्यामुळे गुंतागुंत वाढू शकते आणि सासरच्या बाजूकडूनही कोणतीही चांगली बातमी मिळण्याची शक्यता कमी आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: एक दोन नव्हे 5 ग्रहांची कुंभ राशीत बैठक; कर्क, वृश्चिकसह 6 राशींना त्रासाचा काळ, ताकही फुंकून..!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल