TRENDING:

Astrology: जरा नव्हे 7 वर्षे भयंकर त्रास-अडचणींचा काळ पाहिला! शनिच्या राशीची परीक्षा आता संपणार

Last Updated:
Astrology: साडेसात वर्षांची साडेसाती संपवून शनिची राशी असलेली कुंभ रास लवकरच मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. या राशींच्या लोकांसाठी लवकरच संकटाचे दिवस संपणार आहेत. सध्या मेष, कुंभ आणि मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे. यामध्ये सर्वात आधी कुंभ राशीवरील साडेसातीचा प्रभाव संपेल.साडेसातीच्या प्रभावातून बाहेर येताच कुंभ राशीच्या व्यक्तींची कामे वेगाने पूर्ण होतील. धनधान्याच्या बाबतीत येणारे अडथळे दूर होतील. करिअरमध्ये प्रगती होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जाणून घेऊया कुंभ राशीवरील शनीची साडेसाती कधी संपणार आहे.
advertisement
1/5
जरा नव्हे 7 वर्षे भयंकर त्रास-अडचणींचा काळ पाहिला! शनिच्या राशीची परीक्षा संपेल
हिंदू पंचांगानुसार, सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. 3 जून 2027 रोजी जेव्हा शनी मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल, तेव्हा कुंभ राशीवर अनेक वर्षांपासून सुरू असलेली साडेसाती संपेल. मात्र, 20 ऑक्टोबर 2027 रोजी शनी पुन्हा मीन राशीत येईल, तेव्हा कुंभ राशीवर पुन्हा साडेसातीचा काळ सुरू होईल. परंतु या अल्पकालीन साडेसातीचा परिणाम अत्यंत सौम्य असेल.
advertisement
2/5
साडेसाती कधी सुरू झाली होती? -हिंदू पंचांगानुसार, कुंभ राशीवर शनीची साडेसाती 24 जानेवारी 2020 रोजी सुरू झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत कुंभ राशीने शनीच्या साडेसातीच्या तिन्ही टप्प्यांचा सामना केला आहे.
advertisement
3/5
साडेसातीचा प्रभाव संपल्यानंतर कुंभ राशीच्या लोकांना कोणते लाभ मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा - दीर्घकाळापासून सुरू असलेली पैशांची चणचण संपू शकते. कर्जाचा भार कमी होईल आणि उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळतील.
advertisement
4/5
करिअरमध्ये प्रगती - नोकरी आणि व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील. तुम्हाला यश मिळेल. अडकलेली पदोन्नती आणि पगारवाढ मिळेल. थांबलेल्या कामांना वेग येईल.
advertisement
5/5
मानसिक शांतता - साडेसातीचा प्रभाव संपताच तुम्हाला तणाव, भ्रम आणि मोठ्या चिंतेतून मुक्ती मिळू शकते. घर आणि कुटुंबात आनंदाचे आगमन होईल. नात्यात गोडवा येईल. वैवाहिक जीवनातील मतभेद संपतील. कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणे तुमच्या बाजूने लागतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य लाभेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: जरा नव्हे 7 वर्षे भयंकर त्रास-अडचणींचा काळ पाहिला! शनिच्या राशीची परीक्षा आता संपणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल