TRENDING:

Healthy Cooking Oil : हॉट प्रेस्ड आणि कोल्ड प्रेस्ड ऑईलमध्ये फरक काय? दोन्हींपैकी कोणतं तेल जास्त फायदेशीर?

Last Updated:
Difference between cold-pressed and hot-pressed oil : आजकाल हेल्दी लाइफस्टाइलकडे लोकांचा कल वाढत असून स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या तेलाकडेही विशेष लक्ष दिलं जातं. बाजारात सहज मिळणाऱ्या तेलांबरोबरच 'कोल्ड प्रेस्ड' आणि 'हॉट प्रेस्ड' तेलांची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसते. मात्र अनेकांना या दोन्ही तेलांमधला नेमका फरक काय आहे, कोणतं तेल जास्त आरोग्यदायी आहे, हे माहिती नसतं. त्यामुळे योग्य निवड करण्यासाठी कोल्ड प्रेस्ड आणि हॉट प्रेस्ड तेलांमधला फरक समजून घेणं गरजेचं आहे.
advertisement
1/7
हॉट आणि कोल्ड प्रेस्ड ऑईलमध्ये फरक काय? दोन्हींपैकी कोणतं तेल जास्त फायदेशीर?
कोल्ड प्रेस्ड तेलाची प्रक्रिया पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने केली जाते. शेंगदाणा, तीळ, सूर्यफूल, ऑलिव्ह, सोयाबीन, बदाम अशा बियांना अतिशय कमी तापमानावर हळूहळू प्रेस करून त्यातून तेल काढलं जातं. या प्रक्रियेत उष्णतेचा वापर अत्यल्प असल्यामुळे तेलातील नैसर्गिक गुणधर्म जसेच्या तसे टिकून राहतात. त्यामुळे हे तेल साध्या तेलांच्या तुलनेत थोडं महाग असतं.
advertisement
2/7
कोल्ड प्रेस्ड तेलाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील पोषक घटक. या तेलामध्ये व्हिटॅमिन C, E आणि K, तसेच हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि पचनसंस्थेलाही याचा फायदा होतो. याच कारणामुळे कोल्ड प्रेस्ड तेलाला जास्त हेल्दी मानलं जातं.
advertisement
3/7
याच्या उलट हॉट प्रेस्ड तेल काढण्यासाठी बियांना उच्च तापमानावर गरम केलं जातं. हायड्रॉलिक प्रेसच्या साहाय्याने बियांवर दाब टाकून जलद आणि मोठ्या प्रमाणात तेल काढण्यात येतं. त्यानंतर हे तेल फिल्टर करून बाजारात विक्रीसाठी पाठवलं जातं. ही प्रक्रिया जलद आणि स्वस्त असल्यामुळे हॉट प्रेस्ड तेल सहज उपलब्ध होतं.
advertisement
4/7
मात्र उच्च तापमानाचा वापर झाल्यामुळे हॉट प्रेस्ड तेलातील अनेक महत्त्वाचे पोषक घटक नष्ट होतात. उष्णतेमुळे व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण कमी होतं. त्यामुळे हे तेल कोल्ड प्रेस्ड तेलाइतकं आरोग्यदायी राहत नाही.
advertisement
5/7
आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कोल्ड प्रेस्ड तेल हा अधिक चांगला पर्याय मानला जातो. हॉट प्रेस्ड तेल जर पुढे रिफाइन केलं गेलं, तर त्यातील नैसर्गिक गुणधर्म अजूनच कमी होतात. अशा तेलाचा नियमित वापर शरीरासाठी फारसा फायदेशीर ठरत नाही.
advertisement
6/7
म्हणूनच रोजच्या आहारात शक्य तिथे कोल्ड प्रेस्ड तेलाचा वापर करणं अधिक योग्य ठरतं. मात्र कोणतंही तेल असो, त्याचं सेवन मर्यादित प्रमाणातच करणं गरजेचं आहे. योग्य तेलाची निवड आणि संतुलित वापर केल्यास निरोगी राहण्यासाठी नक्कीच मदत होते.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Healthy Cooking Oil : हॉट प्रेस्ड आणि कोल्ड प्रेस्ड ऑईलमध्ये फरक काय? दोन्हींपैकी कोणतं तेल जास्त फायदेशीर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल