ख्रिसमस, चर्च म्हणजे कॅरोल आलं. ख्रिसमसच्या काळात गायली जाणारी धार्मिक आणि आनंदाची गाणी म्हणजे क्रिसमस कॅरोल्स. पण मुंबईतील आयकॉनिक सेंट थॉमस कॅथेड्रलमध्ये ख्रिसमसची सुरुवात वेगळ्या पद्धतीने करण्यात आली.
Christmas Santa Claus : ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म दिन, मग या दिवशी सांताक्लॉजचा संबंध काय
कॅरोल आणि ख्रिसमस सेलिब्रेशनआधी इथं भारताचं राष्ट्रीय गीत गाण्यात आलं. भारतीय राष्ट्रगीताने ख्रिसमसची सुरुवात करण्यात आली आणि देशातील एकतेचा संदेश देण्यात आला. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ऐतिहासिक चर्चमध्ये प्रत्येक जण शांत, स्तब्ध उभा आहे आणि राष्ट्रदीत गात आहे.
advertisement
भारत म्हणजे विविध धर्मांचं राष्ट्र, हे इथंही दिसून आलं आहे. प्रत्येक जण आपल्या देशाबाबत अभिमान, आदर दाखवत आहे. भारताची खरी शक्ती काय आहे हे इथं दिसून येतं.
मुंबईतील सेंट थॉमस कॅथेड्रल हे फोर्टमधील एक ऐतिहासिक आणि जुनं चर्च आहे, जे ब्रिटिश काळात बांधलं गेलं. हे नियो-गॉथिक शैलीतील हे चर्च भव्य कमानी, रंगीत काचेच्या खिडक्या आणि उंच घड्याळ मनोऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. याला युनेस्कोचा हेरिटेज पुरस्कारही मिळाला आहे.
हे चर्च मुंबईचं झिरो पॉईंट मानलं जातं. जिथून जिथून शहराच्या रस्त्यांची मोजणी सुरू झाली होती. जिथून मुंबईतील अंतर मोजलं जायचं. चर्चगेट स्टेशनला याच चर्चमुळे नाव मिळालं.
