Recipe Video : अचानक पाहुणे आले, काय बनवायचं समजत नाही; फक्त 5 मिनिटांचा हा VIDEO पाहा, 30 मिनिटांत संपूर्ण जेवण तयार

Last Updated:

Full Meal Video : संपूर्ण जेवण फक्त 30 मिनिटांत बनवू शकता. काय वाचून आश्चर्य वाटलं आहे ना तुम्हाला? आता हे कसं शक्य आहे ते पाहुयात.

News18
News18
ख्रिसमसच्या सुट्ट्या, थर्टी फर्स्टची पार्टी यानिमित्ताने लोक फिरायला जात आहेत. एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथं एखादी ओळखीची व्यक्ती राहत असेल तर तिच्या घरी जाणं आलंच. बऱ्याचदा लोक सरप्राइझ द्यायचं म्हणून न सांगता घरी येतात आणि मग तारांबळ उडते. कुणीतरी आपल्याला भेटायला आलं आहे, लांबून आलं आहे, त्यांना जेवल्याशिवाय कसं पाठवायचं. पण अचानक आलेत, त्यांना जाण्याची घाई आहे, मग आता जेवणाला बनवायचं तरी काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे. तर हा व्हिडीओ तुमचा प्रश्न सोडवले.
अचानक पाहुणे घरी आले की काय बनवायचं, हे या व्हिडीओत सांगितलं आहे. फक्त 5 मिनिटांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही संपूर्ण जेवण फक्त 30 मिनिटांत बनवू शकता. काय वाचून आश्चर्य वाटलं आहे ना तुम्हाला? आता हे कसं शक्य आहे ते पाहुयात.
advertisement
जिरा राइस
तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. तेलात जिरं, कढीपत्ता, पाणी, मीठ आणि तांदूळ टाकून शिजवून घ्या.
खीर
तुपात शेवया लालसर भाजून घ्या. यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून भाजून घ्या. तांदूळ भिजवून त्याची पेस्ट करून शिजवून घ्या. आता यात दूध घाला. दुधाला उकळी आली की साखऱ टाका, ड्रायफ्रुट्स टाका आणि उकळी काढा. खीर तयार
advertisement
भाजी
कढईत तेल घाला. जिरे मोहरी टाका. बारीक चिरलेला टाका. आलं-लसूण पेस्ट तेलात परतून घ्या. कढीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो. उकडलेला बटाटा चिरून टाका. लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ घालून थोडं पाणी टाकून एक उकळी येऊ द्या. वरून कोथिंबीर टाका. भाजी तयार. ही भाजी भात आणि पुरी दोघांसोबत जाईल. वेगळी आमटी किंवा वरण बनवण्याची गरज नाही. इथंही तुमचा वेळ वाचतो.
advertisement
पुरी
गव्हाचं पीठ त्यात मीठ टाकून थोडंथोडं पाणी टाकून घट्ट मळून घ्या. तेल लावून पुऱ्या लाटून घ्या. कढईत तेल गरम करून पुऱ्या तळून घ्या. याच तेलात पापड किंवा कुरडया तळून घ्या.
advertisement
पाहुण्यांसाठी संपूर्ण जेवण तयार आहे. ताट वाढ आणि सर्व्ह करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Recipe Video : अचानक पाहुणे आले, काय बनवायचं समजत नाही; फक्त 5 मिनिटांचा हा VIDEO पाहा, 30 मिनिटांत संपूर्ण जेवण तयार
Next Article
advertisement
Raj Thackeray : राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

View All
advertisement