TRENDING:

Shani Budh Yuti 2026: एकदम भारीच योग! बाराव्या राशीत शनि-बुधाच्या महायुतीने धुमाकूळ; 3 राशींची चांदी

Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा स्वभाव आणि प्रभाव असतो. ग्रहांचे गोचर आणि त्यांची युती केवळ व्यक्तीच्या जीवनावरच नाही, तर देश-दुनियेवरही मोठा परिणाम घडवून आणते. एप्रिल 2026 मध्ये शनि आणि बुध या दोन महत्त्वाच्या ग्रहांची युती होणार आहे. ही युती मीन राशीमध्ये होणार असून तिचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडेल. मात्र, 3 राशींसाठी हा काळ विशेष लाभदायी आणि प्रगतीचा ठरणार आहे.
advertisement
1/6
एकदम भारीच योग! बाराव्या राशीत शनि-बुधाच्या महायुतीने धुमाकूळ; 3 राशींची चांदी
मीन राशीत शनि आणि बुध ग्रहांची महायुती - दोन प्रभावी ग्रह एकाच राशीत येतात, तेव्हा त्याचे व्यापक परिणाम पाहायला मिळतात. एप्रिल महिन्यात बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनि आधीपासूनच विराजमान आहे, ज्यामुळे शनि-बुध अशी महायुती तयार होईल. या युतीमुळे काही राशींच्या आयुष्यात सुवर्णकाळ सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/6
वृषभ राशीच्या लोकांसाठी ही ग्रहांची युती अत्यंत सकारात्मक ठरेल. तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येईल आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना मनासारखी संधी मिळू शकते.
advertisement
3/6
वृषभ - नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याचे प्रबळ योग आहेत. व्यापाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील. गुंतवणुकीतून तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि वैवाहिक आयुष्यात गोडवा टिकून राहील.
advertisement
4/6
तूळ - राशीच्या लोकांसाठी ही वेळ नशिबाची पूर्ण साथ देणारी ठरेल. तुमचे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले काम आता पूर्ण होईल. करिअर आणि व्यवसायात सकारात्मक बदल घडून येतील. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यांमधील ओलावा वाढेल.
advertisement
5/6
मीन - मीन राशीतच ही युती होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत आहेत. कोर्ट-कचहरीच्या कामात तुम्हाला दिलासा मिळू शकतो. मानसिक तणाव कमी होऊन तुमचा आत्मविश्वास वाढेल.
advertisement
6/6
मीन - आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन प्रकृतीत सुधारणा होईल. तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि आनंदाच्या बातम्या मिळतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Budh Yuti 2026: एकदम भारीच योग! बाराव्या राशीत शनि-बुधाच्या महायुतीने धुमाकूळ; 3 राशींची चांदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल