TRENDING:

Shani Shukra Yuti 2026: मीन राशीत शनि-शुक्राची युती; मिथुनसह 4 राशींचा आनंद गगनात मावणार नाही

Last Updated:
Shani Shukra Yuti In Meen 2026: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी आपली रास आणि नक्षत्र बदलत असतात. याच क्रमाने, 2026 च्या होळी-धूलिवंदनपूर्वी शुक्र आणि शनी हे दोन मोठे ग्रह मीन राशीत एकत्र येणार आहेत. 2026 मध्ये 4 मार्चला धूलिवंदन आहे, पण त्याआधीच 2 मार्चला शुक्र कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करेल, तिथे शनी महाराज आधीपासूनच बसलेले आहेत.
advertisement
1/6
मीन राशीत शनि-शुक्राची युती; मिथुनसह 4 राशींचा आनंद गगनात मावणार नाही
मीन राशीत होणारी शुक्र आणि शनीची ही युती मिथुनसह 4 राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या युतीमुळे आयुष्यात प्रगल्भता, सर्जनशीलता आणि स्पष्टता तर येईलच, पण सोबतच प्रेम, पैसा, करिअर आणि व्यवसायात स्थिरता सुद्धा येईल. बघूया या युतीचा कोणत्या राशींवर काय परिणाम होईल.
advertisement
2/6
मिथुन - शनी आणि शुक्राची ही युती तुमच्या राशीपासून 10 व्या स्थानी होणार आहे. यामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी ही होळी दुप्पट आनंद घेऊन येईल. तुमच्या खाजगी आणि कामाच्या आयुष्यात जे काही गोंधळ चालू होते, ते आता संपतील आणि कामात स्पष्टता येईल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. शुक्राच्या प्रभावामुळे सुख-सोयी वाढतील आणि शनीमुळे तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.
advertisement
3/6
सिंह - तुमच्या राशीपासून 8 व्या स्थानी ही युती होत आहे. यामुळे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात स्थिरता येईल आणि करिअर, कुटुंब व व्यवसायाबद्दल तुमची समज वाढेल. शनीदेवाच्या कृपेने आयुष्यातल्या अडचणी दूर होतील आणि तुम्ही कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकाल.
advertisement
4/6
सिंह - शुक्राच्या प्रभावामुळे पैशांच्या कटकटी संपतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. आई-वडील आणि मुलांच्या तब्येतीत सुधारणा दिसेल, ज्यामुळे तुमचा देवावरचा विश्वास अजून वाढेल.
advertisement
5/6
वृश्चिक - तुमच्या 5 व्या घरात ही युती होत असल्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि होळीचा आनंद द्विगुणित होईल. शनी तुम्हाला प्रगती करण्याच्या अनेक संधी देईल आणि शुक्राच्या साथीने तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. ही युती तुमच्या खाजगी आणि कामाच्या आयुष्यातील विस्कळीत गोष्टी नीट करेल. जे लोक सिंगल आहेत, त्यांची एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. घरातल्या सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम टिकून राहील.
advertisement
6/6
मकर - तुमच्या राशीपासून 3 व्या घरात ही युती होणार आहे. धुलिवंदनच्या आधीच तुमच्या आयुष्यात नवे रंग भरले जातील. शनी तुम्हाला सगळ्या त्रासातून बाहेर काढेल आणि अनेक लाभ मिळवून देईल. तर शुक्राच्या प्रभावामुळे तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील आणि तुमचं मन भक्ती-अध्यात्मत रमेल. नोकरी करणाऱ्यांचं टेन्शन कमी होईल आणि व्यापाऱ्यांना धंद्यात चांगला नफा बघायला मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Shukra Yuti 2026: मीन राशीत शनि-शुक्राची युती; मिथुनसह 4 राशींचा आनंद गगनात मावणार नाही
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल