TRENDING:

सावधान! शुक्र करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, 'या' 3 राशींच्या लोकांचं होणार मोठं नुकसान; राहावं लागणार अलर्ट

Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये सुख, वैभव आणि प्रेमाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे. शुक्र आता राहूच्या मालकीच्या 'शतभिषा' नक्षत्रात प्रवेश करत आहे.
advertisement
1/7
शुक्र करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, 3 राशींच्या लोकांचं होणार मोठं नुकसान
ज्योतिषशास्त्रामध्ये सुख, वैभव आणि प्रेमाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे. शुक्र आता राहूच्या मालकीच्या 'शतभिषा' नक्षत्रात प्रवेश करत आहे. राहू आणि शुक्र यांच्यात जरी नैसर्गिक मैत्री असली, तरी राहूच्या नक्षत्रात शुक्राचे येणे हे नेहमीच शुभ फळ देते असे नाही.
advertisement
2/7
शुक्राचा हा नक्षत्र बदल विशेषतः कर्क, कन्या आणि मीन या तीन राशींच्या जातकांसाठी काही आव्हाने आणि मानसिक अस्वस्थता घेऊन येऊ शकतो. येत्या काळात या राशींना आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि आर्थिक नियोजनात कमालीची सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
advertisement
3/7
शतभिषा नक्षत्र हे राहूच्या प्रभावाखाली येते आणि ते कुंभ राशीत स्थित आहे. जेव्हा शुक्र या नक्षत्रात येतो, तेव्हा व्यक्तीच्या इच्छा-आकांक्षा प्रचंड वाढतात.
advertisement
4/7
राहू हा 'भ्रम' निर्माण करणारा ग्रह आहे, त्यामुळे या काळात लोक चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतात किंवा झटपट पैसे कमवण्याच्या नादात मोठे नुकसान करून घेऊ शकतात. याला ज्योतिषशास्त्रात 'मायावी प्रेम' किंवा 'आर्थिक मोह' असेही म्हटले जाते.
advertisement
5/7
कर्क - नात्यात दुरावा येण्याची शक्यता: कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन आठव्या भावात प्रभाव टाकेल. जोडीदारासोबत विनाकारण वाद होऊ शकतात. संशयास्पद स्वभावामुळे नात्यात दुरावा येण्याची भीती आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहा आणि कोणावरही आंधळा विश्वास टाकू नका.
advertisement
6/7
कन्या - खर्चावर नियंत्रण हवे: कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र हा सहाव्या भावात सक्रिय होईल. चैनीच्या वस्तूंवर अतोनात खर्च होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे बजेट कोलमडू शकते. आरोग्याबाबत, विशेषतः पोटाच्या किंवा त्वचेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
7/7
मीन - भ्रमात राहू नका: मीन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे भ्रमण बाराव्या भावात होत आहे. तुम्हाला एखादी मोठी गुंतवणूक किंवा गुंतवणुकीची योजना खूप आकर्षक वाटू शकते, पण त्यात फसवणुकीची शक्यता जास्त आहे. परदेशाशी संबंधित कामात कायदेशीर अडचणी येऊ शकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
सावधान! शुक्र करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, 'या' 3 राशींच्या लोकांचं होणार मोठं नुकसान; राहावं लागणार अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल