TRENDING:

Shukra Gochar 2026: वायु तत्वाच्या राशींची हवाच! 06 फेब्रुवारीपासून शुक्राची शुभदृष्टी पडल्यानं धन-वैभव प्राप्तीचे योग

Last Updated:
Shukra Gochar 2026: शुक्र हा ज्योतिषशास्त्रात सुख, संपत्ती, सौंदर्य, प्रेम आणि विलासी जीवनाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत शुक्र प्रबळ असतो, त्यांना जीवनात सर्व प्रकारची भौतिक सुखे सहज प्राप्त होतात.
advertisement
1/5
वायु तत्वाच्या राशींची हवाच! 6 फेब्रुवारीपासून शुक्राची शुभदृष्टी पडल्यानं लाभ
शुक्राचे स्वरूप आणि महत्त्व हा ग्रह माणसाच्या कलात्मक गुणांवर, वैवाहिक सुखावर आणि आर्थिक समृद्धीवर नियंत्रण ठेवतो. कुंभ ही शनीची रास असून ती वायू तत्त्वाची आहे. शुक्र आणि शनी यांच्यात मैत्रीचे नाते असल्याने हे गोचर अनेक राशींसाठी प्रगतीचे दरवाजे उघडणारे ठरेल.
advertisement
2/5
सुख-संपत्तीचा कारक शुक्रदेव 6 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 01:15 वाजता शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. वायू तत्त्वाच्या राशींसाठी शुक्राचे हे गोचर अत्यंत लाभदायक ठरणार असून त्यांच्या सुख-सोयींमध्ये वाढ होईल. या काळात धनप्राप्तीचे योग असून अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. या भाग्यवान राशींविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/5
मिथुन - शुक्र तुमच्या नवव्या स्थानी गोचर करणार असून हे स्थान भाग्याशी संबंधित आहे. शुक्राच्या या बदलामुळे नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. तुमच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल आणि तुमची सर्व नियोजित कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. विशेष म्हणजे 1 मार्चपर्यंत तुम्हाला पैशांची कोणतीही चणचण भासणार नाही. या काळात एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल.
advertisement
4/5
तूळ - शुक्राचे हे गोचर तुमच्या पाचव्या स्थानी होणार आहे. हे स्थान संतान, बुद्धी, विवेक आणि प्रेमाशी संबंधित आहे. या गोचरामुळे तुम्हाला मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल आणि जोडीदाराकडून भरपूर प्रेम लाभेल. तुमची आर्थिक स्थिती अधिक भक्कम होईल. लव्हमेटसोबतचे नाते सुधारण्यासाठी त्यांच्या भावनांचा आदर करा. गुरुजनांशी आदराने वागा. शुक्राचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी मंदिरात किंवा कोणत्याही धार्मिक स्थळी दुधाचे दान करा.
advertisement
5/5
कुंभ - शुक्र तुमच्याच राशीत म्हणजेच पहिल्या (लग्न) स्थानी गोचर करणार आहे. हे स्थान शरीर आणि व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे. या बदलामुळे तुम्हाला अपत्यसुख मिळेल आणि संपत्तीत वाढ होईल. अविवाहितांसाठी विवाहाचे नवीन प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. मात्र, विवाहित व्यक्तींनी आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी आणि त्यांच्याशी वादाचे प्रसंग टाळून प्रेमाने वागावे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shukra Gochar 2026: वायु तत्वाच्या राशींची हवाच! 06 फेब्रुवारीपासून शुक्राची शुभदृष्टी पडल्यानं धन-वैभव प्राप्तीचे योग
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल