TRENDING:

Astrology: शुक्र-राहुची युती जमली! राशीचक्रातील 3 राशींना आता नो टेन्शन, पैसे येण्याचा मार्ग मोकळा

Last Updated:
Astrology: दृक पंचांगानुसार, 06 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रहाचे कुंभ राशीत आगमन झाले. कुंभ राशीत आधीच मायावी राहु स्थित असल्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती होत आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भौतिक सुख, ऐश्वर्य, संपत्ती आणि प्रेमाचा कारक मानला जातो, तर राहु हा अचानक होणारे लाभ, परदेश गमन आणि अनपेक्षित घटनांशी संबंधित आहे.
advertisement
1/6
शुक्र-राहुची युती जमली! राशीचक्रातील 3 राशींना आता नो टेन्शन, पैसे मिळणार
हे दोन परस्पर विरोधी स्वभावाचे पण तितकेच प्रभावी ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याचे पडसाद संपूर्ण राशीचक्रावर उमटतात. विशेषतः आर्थिक व्यवहार, करिअरमधील प्रगती आणि वैयक्तिक नात्यांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असते.
advertisement
2/6
मेष - या युतीचा प्रभाव तुमच्या कुंडलीतील लाभ स्थानावर पडत आहे. यामुळे उत्पन्नाचे नवीन आणि अनपेक्षित मार्ग मोकळे होतील. जर तुम्ही व्यापारात असाल, तर एखादी मोठी डील फायनल होऊ शकते किंवा नवीन क्लायंट मिळतील ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल.
advertisement
3/6
मेष राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा आहे; वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला पदोन्नती किंवा बोनस जाहीर करू शकतात. विशेषतः जे लोक बँकिंग, शिक्षण किंवा आर्थिक सल्लागार क्षेत्रात काम करत आहेत, त्यांना या काळात विशेष ओळख आणि आर्थिक लाभ मिळेल.
advertisement
4/6
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही ग्रहस्थिती कौटुंबिक सुख आणि मालमत्तेत वाढ करणारी ठरेल. बऱ्याच काळापासून रखडलेले जमिनीचे किंवा घराचे व्यवहार आता पूर्ण होतील. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर हा काळ फायदेशीर ठरू शकतो, मात्र राहुच्या प्रभावामुळे घाईने निर्णय न घेता तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. कुटुंबातील जुने वाद मिटून वातावरण सकारात्मक होईल आणि भौतिक सोयीसुविधांवर तुम्ही खर्च कराल. आर्थिक अडचणींतून आता तुमची हळूहळू सुटका होईल.
advertisement
5/6
कुंभ - ही युती तुमच्याच राशीत होत असल्याने याचे सर्वांत महत्त्वाचे परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर दिसतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. आर्थिक दृष्टीने हा काळ सुवर्णकाळ ठरू शकतो, कारण उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
कुंभ - व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग सापडतील आणि रखडलेली कामे नशिबाच्या जोरावर पूर्ण होतील. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले संबंध सुधारेल आणि कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग येईल. नशिबाची भक्कम साथ मिळाल्याने तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: शुक्र-राहुची युती जमली! राशीचक्रातील 3 राशींना आता नो टेन्शन, पैसे येण्याचा मार्ग मोकळा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल