TRENDING:

Bluetooth : तुमच्या फोनचं ब्लूटूथ कायम ऑन असतं? सावधान! एका क्लिकमध्ये Hack होईल मोबाईल

Last Updated:
अनेकांना सवय असते की एकदा ब्लूटूथ सुरू केलं की ते दिवसभर तसंच राहतं. पण हीच छोटीशी चूक सायबर गुन्हेगारांसाठी घराचं उघडं दार ठरू शकते. ब्लूटूथच्या माध्यमातून हॅकर्स तुमच्या फोनमध्ये कशी शिरकाव करतात आणि कोणत्या 'ॲटॅक'पासून तुम्हाला सावध राहायचंय, हे सविस्तर जाणून घ्या.
advertisement
1/9
Bluetooth : तुमच्या फोनचं ब्लूटूथ कायम ऑन असतं? सावधान! एका क्लिकमध्ये Hack होईल मोबाईल
आजच्या धावपळीच्या युगात आपण 'वायरलेस' लाइफस्टाइलचे इतके सवयीचे झालो आहोत की, ब्लूटूथशिवाय आपलं पानही हलत नाही. कानाला लावलेले वायरलेस इअरबड्स असोत, हातातली स्मार्टवॉच असो किंवा गाडीतलं म्युझिक सिस्टम; ब्लूटूथने आपलं जगणं खरंच सोपं केलंय. पण, ज्या सोयीमुळे आपल्याला तार विरहित स्वातंत्र्य मिळालंय, तेच स्वातंत्र्य तुमच्या गोपनीयतेसाठी (Privacy) मोठा धोका ठरू शकतं, याची तुम्हाला जाणीव आहे का?
advertisement
2/9
अनेकांना सवय असते की एकदा ब्लूटूथ सुरू केलं की ते दिवसभर तसंच राहतं. पण हीच छोटीशी चूक सायबर गुन्हेगारांसाठी घराचं उघडं दार ठरू शकते. ब्लूटूथच्या माध्यमातून हॅकर्स तुमच्या फोनमध्ये कशी शिरकाव करतात आणि कोणत्या 'ॲटॅक'पासून तुम्हाला सावध राहायचंय, हे सविस्तर जाणून घ्या.
advertisement
3/9
1. ब्ल्यूजॅकिंग (Bluejacking)हा प्रकार सुरुवातीला केवळ मजेसाठी केला जायचा. यात हॅकर तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या फोनवर मेसेज किंवा फाईल्स पाठवतो. मात्र, आता याचा वापर करून अश्लील कंटेंट किंवा फसवणुकीचे मेसेज पाठवले जात आहेत.
advertisement
4/9
2. ब्ल्यूस्र्फिंग (BlueSnarfing)हा एक गंभीर सायबर हल्ला आहे. यात हॅकर ब्लूटूथच्या कमकुवत दुव्याचा फायदा घेऊन तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट, मेसेज, फोटो आणि खासगी फाईल्स चोरू शकतो. धक्कादायक म्हणजे, तुमचा डेटा चोरीला गेलाय हे तुम्हाला कळतही नाही.
advertisement
5/9
3. ब्लूबगिंग (Bluebugging)या हल्ल्यात हॅकर तुमच्या संपूर्ण डिव्हाइसवर ताबा मिळवतो. तुमच्या नकळत तो कोणालाही कॉल करू शकतो, मेसेज पाठवू शकतो किंवा तुमचं संपूर्ण बँक डिटेल्स तपासू शकतो.
advertisement
6/9
4. मॅन-इन-द-मिडल (MITM) अटॅकजेव्हा दोन ब्लूटूथ डिव्हाइसमध्ये डेटा ट्रान्सफर होत असतो, तेव्हा हॅकर मध्येच शिरून तो डेटा वाचू शकतो किंवा त्यात बदल करू शकतो. यामुळे तुमचे पासवर्ड आणि खासगी संभाषण लीक होण्याचा मोठा धोका असतो.
advertisement
7/9
5. ईव्ह्सड्रॉपिंग (Eavesdropping)ब्लूटूथची रेंज मर्यादित असली तरी, खास उपकरणांच्या सहाय्याने हॅकर दुरूनही तुमची खासगी संभाषणे ऐकू शकतो. यामुळे तुमची आर्थिक माहिती किंवा संवेदनशील पासवर्ड धोक्यात येतात.
advertisement
8/9
'ब्लूबोर्न' (BlueBorne) आणि इतर धोके'ब्लूबोर्न' ही ब्लूटूथमधील एक अशी त्रुटी आहे ज्याने जगातील अब्जावधी उपकरणांना प्रभावित केले होते. यात युजरने कोणत्याही लिंकवर क्लिक न करता किंवा पेअरिंग न करताही हॅकर सिस्टिममध्ये घुसून मालवेअर इन्स्टॉल करू शकतो. तसेच, स्मार्ट गॅजेट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या Bluetooth Low Energy (BLE) तंत्रज्ञानाचा वापर करूनही हॅकर्स अनधिकृत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात.
advertisement
9/9
सुरक्षित राहण्यासाठी काय कराल?गरज नसल्यास ब्लूटूथ नेहमी बंद ठेवा.कधीही अनोळखी किंवा सार्वजनिक ठिकाणच्या ब्लूटूथ डिव्हाइसशी कनेक्ट होऊ नका.तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी पॅच नेहमी अपडेट ठेवा. यामुळे जुन्या तांत्रिक त्रुटी दूर होतात.शक्य असल्यास डिफॉल्ट पिन बदलून कठीण पासवर्ड सेट करा.तंत्रज्ञान जितकं सोयीचं आहे, तितकंच ते सावधगिरीने वापरणं गरजेचं आहे. तुमची एक छोटीशी सतर्कता तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासापासून वाचवू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Bluetooth : तुमच्या फोनचं ब्लूटूथ कायम ऑन असतं? सावधान! एका क्लिकमध्ये Hack होईल मोबाईल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल