TRENDING:

मल्टी-टास्किंग 'क्वीन' असतात 'या' मुलांकाच्या मुली, राहूच्या कृपेने कमावतात बक्कळ पैसा!

Last Updated:
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी असतो, जो त्या व्यक्तीचे गुणधर्म आणि नशिबाची दिशा ठरवतो. ज्योतिषशास्त्रात या मूलांकाच्या मुलींना 'मल्टी-टास्किंग क्वीन' मानले जाते. या मूलांकाचा स्वामी राहू आहे.
advertisement
1/7

2/7
राहू हा अचानक बदल घडवणारा आणि अफाट बुद्धिमत्ता देणारा ग्रह मानला जातो. राहूच्या विशेष कृपेमुळे या मूलांकाच्या मुली केवळ घरच नाही, तर करिअरमध्येही एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या उत्तम रित्या पार पडतात आणि आयुष्यात बक्कळ पैसा कमावतात. हा मूलांक इतर कोणता नसून मूलांक 4 आहे.
advertisement
3/7
अफाट बुद्धिमत्ता आणि कल्पकता: राहू हा कुशाग्र बुद्धीचा कारक आहे. या मूलांकाच्या मुलींची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते. त्या 'आउट ऑफ द बॉक्स' विचार करून कठीण समस्यांवर चुटकीसरशी उपाय शोधतात. त्यांची हीच कल्पकता त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा व्यवसायात इतरांपेक्षा पुढे नेते.
advertisement
4/7
मल्टी-टास्किंगमध्ये माहीर: या मुली एकाच वेळी घर, मुले, नोकरी आणि स्वतःचे छंद या सर्वांचे नियोजन उत्कृष्टपणे करतात. त्यांना एकाच वेळी अनेक कामे करण्याची सवय असते आणि त्यामध्ये त्या कधीही थकत नाहीत. कामाच्या ठिकाणी त्यांच्या या गुणांमुळे त्यांना लवकर पदोन्नती मिळते.
advertisement
5/7
आर्थिक नियोजनात चोख: राहूच्या प्रभावामुळे या मुलींना पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग लवकर सापडतात. त्या केवळ पैसे कमावत नाहीत, तर त्याचे गुंतवणूक नियोजनही अत्यंत हुशारीने करतात. शेअर मार्केट, रिअल इस्टेट किंवा तांत्रिक क्षेत्रात या मुलींना विशेष आर्थिक लाभ होतो.
advertisement
6/7
अचानक धनलाभाचे योग: मूलांक 4 च्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेकदा अचानक धनलाभ होतो. राहू हा सावलीचा ग्रह असला तरी तो अनपेक्षित यश देतो. वडिलोपार्जित संपत्ती किंवा व्यवसायात अचानक मिळालेले मोठे कंत्राट यामुळे त्यांची तिजोरी नेहमी भरलेली राहते.
advertisement
7/7
स्पष्टवक्तेपणा आणि धाडस: या मुली कोणालाही न घाबरता आपले मत मांडतात. कोणतेही मोठे धाडस करताना त्या डगमगत नाहीत. व्यवसायात नवीन प्रयोग करण्याची त्यांची तयारी त्यांना मोठी आर्थिक उंची गाठून देते. राहू त्यांना संघर्षातून मार्ग काढण्याची शक्ती देतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
मल्टी-टास्किंग 'क्वीन' असतात 'या' मुलांकाच्या मुली, राहूच्या कृपेने कमावतात बक्कळ पैसा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल