TRENDING:

पुण्यात Radio Jockey चा जॉब अन् अभिजित खांडकेकरची ती धक्कादायक सकाळ, ऐकून प्रार्थना बेहेरेही झाली शॉक, VIDEO

Last Updated:

अनेक वर्षांनी अभिनेता अभिजित खांडकेकर त्याच्या रेडिओ ऑफिसला पोहोचला आणि तिथल्या चांगल्या आठवणी सांगत एक धक्कादायक अनुभव देखील त्याने शेअर केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून मराठी टेलिव्हिजनला मिळालेला एक हँडसम अभिनेता म्हणजे अभिजित खांडकेकर. या मालिकेनंतर त्याने अनेक मालिकेत काम केलं. 'माझ्या नवऱ्याची बायको', 'तुझेच मी गीत गात आहे' सारख्या मालिकांनी त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केलं. पण तुम्हाला माहिती आहे का अभिजित खांडकेकर अभिनेता होण्याआधी रेडिओ जॉकी होता. पुण्यात रेडिओ सिटीला तो काम करत होता. अनेक वर्षांनी अभिजित त्याच्या रेडिओ ऑफिसला पोहोचला आणि तिथल्या चांगल्या आठवणी सांगत एक धक्कादायक अनुभव देखील त्याने शेअर केला.
News18
News18
advertisement

अभिजीत खांडकेकरने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी पुण्यात रेडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरुवात केली होती. तो पुण्यातीलरेडिओ सिटीच्या पहिल्या बॅचचा भाग होता. जवळपास 5 ते 6 वर्षे त्याने रेडिओ सिटीमध्ये काम करत श्रोत्यांचे मनोरंजन केले.

( टेलिव्हिजनची सोज्वळ सून, सोशल मीडियावर भलतीच बोल्ड; नुसतं जॅकेट घातलं अन्... PHOTO )

अभिजित खांडकेकर 'सखे गं साजणी' या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.या सिनेमाच्या प्रमोशननिमित्तानं तो पुण्यात रेडिओ सिटीच्या ऑफिसला पोहोचला. तिथे रेडिओ सिटीमध्ये तो जेव्हा काम करायचा तेव्हा तो ज्या डेस्कवर बसायचा तो डेस्क त्याने प्रार्थना आणि पूजाला दाखवला. अभिजीतने सांगितलेल्या आठवणींमध्ये एक घटना मात्र अत्यंत धक्कादायक होती. रेडिओ सिटीच्या ऑफिसच्या खाली एक नाला होता. तिथे अभिजितला एके सकाळी डेडबॉडी तरंगताना दिसली होती.

advertisement

अभिजित म्हणाला, "माझा शो सकाळी सात ते अकरा असायचा. मी पहाटे यायचो. पहाटे सिक्युरिटी गार्ड आणि मी आम्ही दोघेच असायचो. एकदा मी आलो, कॉफी घेतली आणि माझी सवय होती की बाहेर बघायचं. तेव्हा मला तिथे काहीतरी लाल रंगाचं तरंगताना दिसलं. मी जर परत परत पाहिलं. मला सारखं वाटत होतं की मला जे वाटतंय हे तेच आहे. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले त्यांनी मला विचारलं की, कुठे दिसतंय तुम्हाला मी त्यांना दाखवलं म्हटलं हे बघा."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं मंदिर, जिथं 90 वर्षांपासून सुरू आहे अखंड दिवा, इतिहास तुम्हाला माहितीये का?
सर्व पहा

अभिजीतने सांगितलेली ही घटना ऐकून प्रार्थना बेहेरे आणि पूजा सावंत काही क्षण स्तब्ध झाल्या. हे ऐकीन त्यांना धक्काच बसला. RJ शोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर अभिजितचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
पुण्यात Radio Jockey चा जॉब अन् अभिजित खांडकेकरची ती धक्कादायक सकाळ, ऐकून प्रार्थना बेहेरेही झाली शॉक, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल