मैत्रिणीच्या नवऱ्याशीच केलेलं लग्न
हंसिका आणि सोहेल त्यांच्या लग्नापासूनच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले होते. कारण हंसिकाची जवळची मैत्रीण रिकी बजाजशी सोहेलचं पहिलं लग्न झालं होतं. विशेष म्हणजे, या लग्नात हंसिकाने धमाल केली होती आणि नवरीची बेस्टफ्रेंड म्हणून तोराही मिरवला होता. जेव्हा सोहेल आणि हंसिकाच्या लग्नाची माहिती समोर आली, तेव्हा नेटकऱ्यांनी हंसिकावर मैत्रिणीचा संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. मात्र हंसिकाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. 'हंसिका लव शादी ड्रामा' या वेब सीरिजमधून आपली बाजू मांडली होती. आता हंसिकाच्या घटस्फोटाची बातमी समोर येताच या वादाला पुन्हा तोंड फुटलं आहे.
advertisement
का होतोय हंसिका-सोहेलचा घटस्फोट?
हंसिकाचे वकील अदनान शेख यांनी या घटस्फोटामागची काही महत्त्वाची कारणं स्पष्ट केली आहेत. त्यांच्या मते, लग्नानंतर काही काळातच हंसिका आणि सोहेलला हे कळलं होतं की त्यांचे विचार आणि जीवनशैली एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी आहे. रोजच्या छोट्या-छोट्या भांडणांमुळे त्यांना एका छताखाली राहणं कठीण झालं होतं. त्यातच दोघांचंही बीझी शेड्यूल आणि प्रोफेशनल लाइफ यामुळे त्यांच्यातील संवाद पूर्णपणे बंद झाला होता. अखेर, दोघांनीही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हंसिकाने सोहेलकडून कोणत्याही प्रकारची पोटगी किंवा संपत्तीची मागणी केलेली नाही.
'शाका लाका बूम बूम' ते साऊथची सुपरस्टार
हंसिकाने आपल्या करिअरची सुरुवात 'शाका लाका बूम बूम', 'सोनपरी' आणि 'कोई... मिल गया' यांसारख्या सुपरहिट मालिका आणि चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून केली होती. पुढे जाऊन तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.
