TRENDING:

Success Story : शिक्षकाने पारंपरिक पिकांना दिला फाटा, केली खरबूज आणि टरबूज लागवड, 65 दिवसांत अडीच लाख नफा

Last Updated:
शिक्षक शेतकरी बाबासाहेब मेटकरी यांनीही असाच एक प्रयोग केला आहे. त्यांनी खरबूज आणि टरबूज लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. यामधून त्यांना लाखोंचा नफा मिळणार आहे.
advertisement
1/5
शिक्षकाने पारंपरिक पिकांना दिला फाटा, केली खरबूज आणि टरबूज लागवड, 65 दिवसांत अडीच लाख नफा
पारंपरिक पिकांमधून आजकाल जास्त उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिक्षक शेतकरी बाबासाहेब मेटकरी यांनीही असाच एक प्रयोग केला आहे. त्यांनी खरबूज आणि टरबूज लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. यामधून त्यांना लाखोंचा नफा मिळणार आहे.
advertisement
2/5
बाबासाहेब मेटकरी यांना 14 एकर शेती आहे. बाबासाहेब मेटकरी यांचे शिक्षण एम.ए., बी.एड. पर्यंत झाले आहे. त्यांचे वडील शेतामध्ये नेहमी पारंपरिक पद्धतीने ऊस, मका आणि ज्वारीची शेती करत होते. परंतु शिक्षक असलेल्या बाबासाहेब यांना शेतात नवीन काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी युट्युबवर विविध शेतीविषयक व्हिडिओ पाहून खरबूज आणि टरबूज लागवडीची सविस्तर माहिती घेतली.
advertisement
3/5
त्यानंतर त्यांनी अडीच एकरमध्ये खरबूज आणि अडीच एकरमध्ये टरबूज अशी लागवड केली. या लागवडीसाठी एकरी साधारणपणे एक लाख रुपयांपर्यंत खर्च आल्याचे मेटकरी यांनी सांगितले.
advertisement
4/5
बाबासाहेब मेटकरी सांगतात की, खरबूज आणि टरबूज पिकाला वेळेवर पाणी देणे, योग्य खत व्यवस्थापन करणे. तसेच रोग-कीड नियंत्रणासाठी नियोजनबद्ध फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
advertisement
5/5
या पिकांचे योग्य व्यवस्थापन केल्यास खरबूजाचे एकरी 13 ते 15 टन उत्पादन मिळते, तर टरबूजाचे एकरी 16 ते 17 टन उत्पादन मिळते. 60 ते 65 दिवसांत बाबासाहेब मेटकरी यांना दोन ते अडीच लाख रुपयांचा नफा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकाची जबाबदारी सांभाळत शेतीतही प्रयोगशीलता दाखवणाऱ्या बाबासाहेब मेटकरी यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : शिक्षकाने पारंपरिक पिकांना दिला फाटा, केली खरबूज आणि टरबूज लागवड, 65 दिवसांत अडीच लाख नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल