उद्या सूर्याची कुंभ राशीत एन्ट्री, 'या' राशींच्या आयुष्यात होणार उलथापालथ; 1 महिना राहावं लागणार अलर्ट!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. उद्या म्हणजेच 13 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्य मकर राशीतून बाहेर पडून आपल्या शत्रू ग्रहाच्या, म्हणजेच शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. उद्या म्हणजेच 13 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्य मकर राशीतून बाहेर पडून आपल्या शत्रू ग्रहाच्या, म्हणजेच शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
advertisement
2/7
सूर्याचा हा गोचर अनेक राशींसाठी 'भाग्य उजळवणारा' असला तरी, काही राशींसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो. सूर्य जेव्हा कुंभ राशीत जातो, तेव्हा तिथे आधीच उपस्थित असलेल्या बुध आणि राहू यांच्याशी त्याची युती होते.
advertisement
3/7
यामुळे काही राशींच्या जातकांना मानसिक तणाव, आरोग्याच्या तक्रारी आणि कामात अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः मेष, वृषभ आणि धनु या तीन राशींच्या लोकांनी येत्या महिनाभर अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे.
advertisement
4/7
मेष - आर्थिक व्यवहारात सावधानता: मेष राशीसाठी हा गोचर लाभ स्थानात होत असला तरी, राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला भ्रमिष्ट वाटू शकते. या काळात कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा ते परत मिळणे कठीण होईल. शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. अतिआत्मविश्वासामुळे हातात आलेली संधी गमावू नका.
advertisement
5/7
वृषभ - कामाच्या ठिकाणी ताण: तुमच्या दशम भावात सूर्य प्रवेश करत आहे. यामुळे अधिकार वाढतील पण जबाबदाऱ्यांचे ओझेही वाढेल. वरिष्ठांशी संवाद साधताना नम्र राहा. तुमच्या कामाचे श्रेय दुसरे कोणीतरी घेण्याचा प्रयत्न करेल, अशा वेळी शांत राहून आपले काम चोख बजावा. राजकारणापासून दूर राहणे हिताचे ठरेल.
advertisement
6/7
धनु - आरोग्याची काळजी: धनु राशीच्या तिसऱ्या भावात सूर्य भ्रमण करणार आहे. हे स्थान पराक्रमाचे असले तरी आरोग्यासाठी चढ-उताराचे ठरू शकते. प्रवास करताना वाहन सावधगिरीने चालवा. डोळ्यांचे विकार किंवा हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. भावंडांशी असलेल्या संबंधात दुरावा येणार नाही याची काळजी घ्या.
advertisement
7/7
सूर्याचा हा बदल तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारा असू शकतो. 13 फेब्रुवारी ते 14 मार्च या काळात संयम आणि विवेक राखल्यास तुम्ही या आव्हानात्मक काळावर सहज मात करू शकाल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
उद्या सूर्याची कुंभ राशीत एन्ट्री, 'या' राशींच्या आयुष्यात होणार उलथापालथ; 1 महिना राहावं लागणार अलर्ट!