TRENDING:

Surya Grahan 2026: सूर्य ग्रहणावर पंचग्रही योग! संपूर्ण 1 महिना 4 राशीच्या लोकांकडे येणार पैसा; डबल कमाई

Last Updated:
Surya Grahan 2026: 17 फेब्रुवारी रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण दुपारी 03:26 ते संध्याकाळी 07:57 पर्यंत असेल. जरी हे ग्रहण भारतात दिसणार नसले आणि त्याचा सूतक काळ पाळण्याची गरज नसली, तरी एका विशिष्ट खगोलीय घटनेमुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
advertisement
1/5
सूर्य ग्रहणावर पंचग्रही योग! संपूर्ण 1 महिना 4 राशीच्या लोकांकडे येणार डबल पैसा
या दिवशी कुंभ राशीमध्ये राहु, सूर्य, बुध, शुक्र आणि चंद्र एकत्र येत असून 'पंचग्रही योग' निर्माण होत आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी होणारा हा दुर्मिळ योग चार राशींसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे.
advertisement
2/5
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी हा पंचग्रही योग करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग उघडणारा ठरेल. जे लोक अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना लवकरच चांगली बातमी मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नती आणि पगारवाढीचे योग असून व्यापाऱ्यांचा नफा वाढेल. आर्थिक नियोजनामुळे खर्चावर नियंत्रण राहील आणि मानसिक समाधान लाभेल.
advertisement
3/5
मिथुन - मिथुन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये उत्तम वाढ पाहायला मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. विशेषतः क्रीडा किंवा फिटनेस क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ अतिशय फलदायी आहे. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नवीन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे.
advertisement
4/5
तूळ - या योगामुळे तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू भक्कम होईल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. जुन्या कर्जातून किंवा गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे सुख मिळेल. आयुष्यातील एखादी मोठी समस्या दूर होऊन प्रकृती उत्तम राहील.
advertisement
5/5
धनू - सूर्यग्रहण आणि पंचग्रही योगाचा हा दुर्मिळ संयोग धनु राशीच्या लोकांचे भाग्य उजळवणारा ठरेल. पैसा मिळवणे आता पूर्वीपेक्षा सोपे होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि एखाद्या सदस्याच्या यशामुळे घराची प्रतिष्ठा वाढेल. अनावश्यक खर्चावर मर्यादा येईल आणि खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींमुळे आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Surya Grahan 2026: सूर्य ग्रहणावर पंचग्रही योग! संपूर्ण 1 महिना 4 राशीच्या लोकांकडे येणार पैसा; डबल कमाई
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल