Surya Grahan 2026: माघी अमावस्येला सालातील पहिलं सूर्यग्रहण; या 5 राशींचे नशीब मात्र लख्ख उजळणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Grahan 2026 Horoscope: फेब्रुवारीमध्ये माघी अमावास्येच्या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण कुंभ राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात लागेल. या ग्रहणाची सुरुवात 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी होईल आणि त्याची समाप्ती रात्री 7 वाजून 57 मिनिटांनी होईल. हे ग्रहण दक्षिण आफ्रिका, दक्षिण अर्जेंटिना आणि अंटार्क्टिकाच्या काही भागांत पाहायला मिळेल. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे येथे सुतक काळ पाळण्याची गरज नाही. मात्र, या ग्रहणाचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.
advertisement
1/5

मेष - वर्षातील पहिले सूर्यग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी नशीबवान ठरेल. या राशीच्या व्यक्तींना करिअर आणि कार्यक्षेत्रात पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. पदोन्नतीचे प्रबळ योग असून नोकरीत सकारात्मक बदल घडून येईल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आणि शानदार असणार आहे.
advertisement
2/5
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अतिशय उत्तम राहील. करिअरमध्ये मोठी प्रगती पाहायला मिळेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल, धनलाभाचे योग येतील. व्यवसायाशी निगडित असलेल्या लोकांना विशेष लाभ प्राप्त होईल. तुमच्या नवीन योजना यशस्वी होतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
advertisement
3/5
सिंह - सिंह राशीच्या व्यक्तींच्या मान-सन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. नोकरीतील बदलामुळे तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. प्रमोशन मिळण्याचे चांगले योग असून पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. एकंदरीत तुमच्यासाठी हा काळ खूपच छान आहे.
advertisement
4/5
तूळ - तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती एकदम चांगली राहील. तुमची दीर्घकाळापासून रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळण्याचे प्रबळ संकेत मिळत आहेत. या ग्रहणाच्या प्रभावामुळे तुम्हाला वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचे सुख प्राप्त होऊ शकते.
advertisement
5/5
धनू - धनू राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण नशीब बदलणारे ठरेल. विशेषतः परदेशाशी संबंधित कामांमध्ये या राशीच्या लोकांना मोठे यश मिळेल. तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकता, ते भविष्यात फायदेशीर ठरेल. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग या काळात प्रबळ होत आहेत.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Surya Grahan 2026: माघी अमावस्येला सालातील पहिलं सूर्यग्रहण; या 5 राशींचे नशीब मात्र लख्ख उजळणार