खूप सोसावं लागत! नशिबाची साथ मिळवण्यासाठी तरसतात 'या' 4 राशींचे लोक, सूर्याची दुश्मनी वाढवते अडचणी
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य हा आत्मा, अधिकार आणि यशाचा कारक मानला जातो. मात्र, सर्वच राशींसाठी सूर्याची स्थिती नेहमीच सुखद नसते. ज्योतिषीय गणनेनुसार, सूर्य आणि काही ग्रहांमध्ये नैसर्गिक 'शत्रुत्व' मानले जाते.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य हा आत्मा, अधिकार आणि यशाचा कारक मानला जातो. मात्र, सर्वच राशींसाठी सूर्याची स्थिती नेहमीच सुखद नसते. ज्योतिषीय गणनेनुसार, सूर्य आणि काही ग्रहांमध्ये नैसर्गिक 'शत्रुत्व' मानले जाते.
advertisement
2/7
विशेषतः शुक्र आणि शनीच्या राशींमध्ये जेव्हा सूर्याचे संक्रमण होते किंवा या राशींच्या कुंडलीत सूर्य कमकुवत असतो, तेव्हा जातकांना भाग्याची साथ मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.
advertisement
3/7
4 राशींच्या जातकांना आयुष्यात अनेकदा नशिबाची साथ मिळवण्यासाठी तरसावे लागते. कोणत्या आहेत त्या राशी आणि कोणत्या आव्हानांचा या राशीच्या जातकांना सामना करावा लागतो जाणून घेऊ.
advertisement
4/7
वृषभ - शुक्राशी शत्रुत्व: वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो सूर्याचा शत्रू मानला जातो. यामुळे या राशीच्या जातकांना अनेकदा कठोर परिश्रम करूनही त्याचे फळ उशिराने मिळते. विशेषतः वडिलोपार्जित संपत्ती किंवा सरकारी कामात अडथळे येतात. यांना नशिबापेक्षा कर्मावर जास्त अवलंबून राहावे लागते.
advertisement
5/7
तूळ - सूर्याची नीच रास: तूळ राशीत सूर्य 'नीच' मानला जातो, म्हणजेच त्याची शक्ती येथे सर्वात कमी असते. यामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वारंवार डळमळीत होतो. समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी यांना इतरांपेक्षा दुप्पट मेहनत करावी लागते. नशिबाची साथ मिळण्यात वारंवार विलंब होतो.
advertisement
6/7
मकर - शनी-सूर्य संघर्ष: मकर राशीचा स्वामी शनी असून शनी आणि सूर्य हे पिता-पुत्र असले तरी एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. यामुळे मकर राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये सुरुवातीला खूप संघर्ष असतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी पटत नाही आणि यश मिळवताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.
advertisement
7/7
कुंभ - यशासाठी दीर्घ प्रतीक्षा: कुंभ ही देखील शनीचीच रास आहे. या राशीच्या जातकांना नशिबाची साथ सहजासहजी मिळत नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात यांना यश मिळते, पण तोपर्यंत अनेक संघर्षातून जावे लागते. सूर्याच्या प्रतिकूलतेमुळे यांना सरकारी क्षेत्रात किंवा पित्याकडून सहकार्य मिळण्यास अडचणी येतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
खूप सोसावं लागत! नशिबाची साथ मिळवण्यासाठी तरसतात 'या' 4 राशींचे लोक, सूर्याची दुश्मनी वाढवते अडचणी