Astrology: खूप मोठा संघर्ष सोसला! या राशींचे आता दिवस पालटणार; बुध-शुक्राची चाल शुभ फळदायी
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल मंगळवारचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा मंगळवारचं दैनिक राशीभविष्य 19 नोव्हेंबर 2024..
advertisement
1/12

मेष (Aries) : दिवस ऊर्जादायी आणि सकारात्मक आहे. ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील. तुमच्या नेतृत्वकौशल्याचे कौतुक होईल. नवीन प्रकल्पावर काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या कल्पना शेअर करण्याची संधी मिळेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. यामुळे तुम्हाला चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवा. कुटुंबातील सदस्य तुम्हाला मदत करतील.Lucky Color : GreenLucky Number : 5
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : दिवस चांगला आहे. तुमचं स्वप्न साकार करण्याची संधी मिळू शकते. या संधीचा योग्य वापर करा. वैद्यकीय शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल. तुम्ही तुमच्या क्षेत्रात चांगले नाव कमवाल. पैसे कमावण्याची संधी मिळेल. कामात यशस्वी व्हाल. दिवस आनंदात जाईल.Lucky Color : WhiteLucky Number : 3
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : दिवस प्रतिकूल आहे. कामावर लक्ष केंद्रित करून ते काळजीपूर्वक करावं लागेल. व्यवसायात अनुभवाची गरज भासेल. गुंतवणूक काळजीपूर्वक करा. आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवा. गरज पडल्यास खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या, आहाराकडे लक्ष द्या. मतभेद आणि भांडण टाळा. नातेसंबंधाकडे लक्ष द्या. नातेवाईकांशी समजूतदारपणे संवाद साधा.Lucky Color : PinkLucky Number : 10
advertisement
4/12
कर्क (Cancer) : दिवसभरात थोडा चढ-उतार जाणवेल. मनात वेगवेगळे विचार येऊ शकतात. कुटुंबातील समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. पण या समस्या स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करा. काही अडचण असेल तर संवादातून त्या सोडवा. नोकरदार व्यक्ती कामात व्यस्त राहतील. आर्थिक फायदा होईल. इच्छेनुसार खर्च करू शकता. कमाईतून समाधान मिळेल. पण खर्चाकडे लक्ष द्या.Lucky Color : Sky BlueLucky Number : 1
advertisement
5/12
सिंह (Leo) : दिवस अनुकूल आहे. तुमची कार्यशैली तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. वैयक्तिक संबंधांसाठी दिवस उत्तम आहे. तुम्ही अनेक लोकांशी संपर्क साधाल. नव्याने मैत्रीला सुरुवात कराल. आरोग्याबाबत मोठी समस्या उद्भवणार नाही. व्यवसायात काम पुढे नेण्यासाठी नवीन योजना अंमलात आणाल. उत्पन्नाचे स्त्रोत सुधारल्याने बँक बॅलन्स वाढेल.Lucky Color : BlueLucky Number : 11
advertisement
6/12
कन्या (Virgo) : चांगले रिझल्ट मिळतील. कार्यशैलीने वरिष्ठांना प्रभावित कराल. वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. वैयक्तिक नातेसंबंधासाठी दिवस चांगला आहे. मैत्रीत प्रेमाची सुंदर सुरूवात होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात नवीन योजना राबवून काम पुढे नेऊ शकाल. उत्पन्नाचे स्रोत आणि बँक बॅलन्स वाढेल.Lucky Color : BrownLucky Number : 6
advertisement
7/12
तूळ (Libra) : दिवस फारसा अनुकूल नाही. आरोग्याकडे लक्ष द्या. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवा. नात्यात स्पष्टता आणण्यासाठी योग्य वेळ द्या. कामात संयम आणि चिकाटी ठेवा. व्यवसायात नवीन मार्ग शोधा. व्यवसायात नवीन मार्गाने गुंतवणूक करावी लागू शकते.Lucky Color : PurpleLucky Number : 9
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : ध्येय साध्य करण्यासाठी कामात सतत प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तसेच स्वतःला सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मानसिक तणाव दूर करण्यासाठी ध्यानधारणा किंवा योगा करा. आरोग्याच्या किरकोळ समस्यांपासून सावध रहा. संतुलित आहार घ्या. पुरेसे पाणी प्या. समतोल राखणं गरजेचं आहे. सकारात्मक आणि उत्साही रहा. तुमचे प्रयत्न तुम्हाला यशाकडे नेतील.Lucky Color : Dark GreenLucky Number : 2
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : दिवस नवीन संधीचा आहे. तुमचे सकारात्मक विचार आणि उत्साही व्यक्तिमत्व लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा. नातं मजबूत करण्यासाठी दिवस महत्त्वाचा आहे. नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकता. सर्जनशीलता समोर येईल. त्यामुळे कल्पना शेअर करण्यात संकोच करू नका. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक पुढे जा. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात यश मिळेल.Lucky Color : PurpleLucky Number : 9
advertisement
10/12
मकर (Capricorn) : दिवस उत्तम आहे. कामात यश मिळेल. विरोधकांपासून सावध रहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया टाळा. कुटुंबातील वाद शांत राहून टाळा. तुमचा राग कामात अडथळे निर्माण करू शकतो. खर्चाकडे लक्ष न दिल्यास पैशाची कमतरता भासू शकते.Lucky Color : BlackLucky Number : 12
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : दिवस खास आहे. पण फारसा अनुकूल नाही. तुमच्या विचारांमुळे आसपासच्या लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. भावनिक समतोल ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. आहाराकडे विशेष लक्ष द्या. नोकरदार व्यक्तींना नोकरीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामाबद्दल सावध रहा. कामात जास्त मेहनत घ्यावी लागेल.Lucky Color : OrangeLucky Number : 15
advertisement
12/12
मीन (Pisces) : दिवस उत्तम आहे. तुम्हाला पैसे मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. नातेवाईकांशी वाद टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरदार व्यक्तींनी कार्यालयीन राजकारणापासून दूर रहावे अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संध्याकाळचा वेळ प्रियजनांसोबत घालवण्यासाठी उत्सुक असाल. मनोरंजनाच्या साधनांवर पैसे खर्च करावे लागतील. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. नवीन वाहन किंवा गृहोपयोगी वस्तू खरेदी करू शकता.Lucky Color : MagentaLucky Number : 7
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: खूप मोठा संघर्ष सोसला! या राशींचे आता दिवस पालटणार; बुध-शुक्राची चाल शुभ फळदायी