TRENDING:

'विरोश'नंतर आणखी एक सेलिब्रिटी अडकणार लग्नाच्या बेडीत; रश्मिका-विजयच्या लग्नावेळीच जाहीर केली तारीख

Last Updated:
Allu Sirish Wedding : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नादरम्यानच या सेलिब्रिटीनेही आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली. काही महिन्यांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता.
advertisement
1/5
'विरोश'नंतर आणखी एका सेलिब्रिटीचं लग्न; रश्मिका-विजयच्या लग्नावेळीच सांगितली डेट
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची प्रतीक्षा चाहत्यांना होती, अखेर दोघांचं लग्न पार पडलं आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी दोघांनी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. आता या कपलनंतर आणखी एक सेलिब्रिटी लग्न करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या लग्नाची तारीख ठरली आहे आणि त्याने ती सोशल मीडियावर जाहीर केली आहे.
advertisement
2/5
31 ऑक्टोबर 2025 रोजी त्याच्या वाढदिवशीच साखरपुडा झाला होता.  काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी दुबईमध्ये जवळच्या मित्रांसह एक भव्य यॉट पार्टी आयोजित केली होती. त्यानंतर हे कपल हैदराबादला परतलं आणि घरी पारंपारिक पूजा, विधी केले. आता 6 मार्च 2026 रोजी हा सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकणार आहे.
advertisement
3/5
हा सेलिब्रिटी आहे अभिनेता अल्लू सिरीश. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा भाऊ. हैदराबादमध्ये तो लग्न करणार आहे. त्याने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.  पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे, "नयनिका आणि मी 6 मार्च रोजी कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न करणार आहोत. त्याआधी 2 मार्च रोजी तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील लोकांसाठी 2 मार्चला हैदराबादमधील अल्लू स्टुडिओमध्ये  प्री-वेडिंग पार्टी ठेवण्यात आली आहे.
advertisement
4/5
आता सिरीशची होणारी नवरी कोण आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल, तर ती तिचं नाव आहे नयनिका रेड्डी, जी खूप वर्षांपासून त्याची गर्लफ्रेंड आहे. गेली अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत आहेत. नयनिका हैदराबादमध्ये राहते. तिचा मनोरंजन क्षेत्राशी काही संबंध नाही. तिच्या फॅमिलीचा बिझनेस आहे आणि त्यातच ती मदत करते.
advertisement
5/5
रश्मिका आणि विजयसारखंच या कपलनेही आपलं लग्न खासगी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना त्यांच्या खास दिवशी मीडियाचं जास्त लक्ष नको आहे. त्याच्या लग्नाची तारीख जारी करण्यात आली असली, तरी लग्नाचं ठिकाण अद्याप जाहीर केलेलं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'विरोश'नंतर आणखी एक सेलिब्रिटी अडकणार लग्नाच्या बेडीत; रश्मिका-विजयच्या लग्नावेळीच जाहीर केली तारीख
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल