लग्नानंतर 2 वर्षांत घटस्फोट! आयुष्यात नवा बॉयफ्रेंड, 1 महिन्यात प्रेग्नंट झाली अभिनेत्री; केलं दुसरं लग्न
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pregnant Actress Second Marriage : घटस्फोटानंतर तिने स्वतःला पूर्णपणे कामात वाहून घेतलं. तिने तिचं वैयक्तिक आयुष्य बराच काळ सगळ्यांपासून दूर ठेवलं. पण गोव्यात ती पुन्हा प्रेमात पडली डेटिंगच्या पहिल्या महिन्यातच ती प्रेग्नंट झाली आणि तिने दुसरं लग्न केले.
advertisement
1/7

श्रीदेवी, नीना गुप्ता, नेहा धुपिया, दिया मिर्झा आणि आलिया भट्ट अशा अनेक अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्या आहेत. पण एक अशी अभिनेत्री जिचं वैयक्तिक आयुष्य एखाद्या फिल्म स्टोरीपेक्षा कमी नाही. वयाच्या सतराव्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 2014 मध्ये कारकिर्दीच्या शिखरावर असताना तिनं पहिलं लग्न केलं पण ते फार काळ टिकलं नाही. अवघ्या दोन वर्षांतच अभिनेत्रीचा घटस्फोट झाला.
advertisement
2/7
ही अभिनेत्री आहे अमला पॉल. साऊथ इंडस्ट्रीतील ही अभिनेत्री तिच्या बोल्ड शैली आणि वैयक्तिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे. अमलाने वयाच्या 17 व्या वर्षी 2009 मध्ये आलेल्या मल्याळम चित्रपट 'नीलथमारा' मधून पदार्पण केलं.
advertisement
3/7
तिने तमिळ, तेलुगू आणि हिंदीसह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. 2010 मध्ये आलेला मैना हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यानंतर तिने देईवा थिरुमगल, वेलाईला पट्टधारी (व्हीआयपी), रत्सान आणि थलाईवा यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.
advertisement
4/7
अमलाचे वैयक्तिक आयुष्य तिच्या चित्रपटांइतकेच नाट्यमय राहिलं आहे. देईवा थिरुमगल आणि थलाईवा या चित्रपटांच्या निर्मितीदरम्यान ती दिग्दर्शक ए.एल. विजय यांच्या प्रेमात पडली. 2014 मध्ये त्यांचं थाटात लग्न झालं. पण 2016 मध्ये ते वेगळे झाले आणि 2017 मध्ये घटस्फोट झाला. कारकिर्दीच्या शिखरावर असताना अमलाचा घटस्फोट घेण्याचा निर्णय खूप चर्चेचा विषय होता.
advertisement
5/7
घटस्फोटानंतर अमलाने अभिनयावर लक्ष केंद्रीत केलं. या काळात तिची भेट तिचा जुना मित्र जगत देसाईशी झाली, जो पर्यटन क्षेत्रातील व्यवस्थापक होता. ही मैत्री प्रेमात फुलली आणि नोव्हेंबर 2023 मध्ये दोघांनी कोची इथं एका साध्या समारंभात लग्न केलं.
advertisement
6/7
अमलाने एका मुलाखतीत ती लग्नाआधीच गर्भवती असल्याचं उघड केलं. ती म्हणाली, "आम्ही लग्नाचा विचार केला नव्हता. आम्हाला वाटलं होतं की आम्ही एकत्र राहू, कदाचित नंतर एक मूल दत्तक घेऊ. पण डेट केल्याच्या पहिल्या महिन्यातच मी अनपेक्षितपणे गर्भवती राहिले. तेव्हाच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला"
advertisement
7/7
अमलाने आणखी एक मनोरंजक किस्सा सांगितला. तिने खुलासा केला की तिच्या आयुष्यातील एका कठीण काळात, ती एका ज्योतिषीला भेटली ज्याने भाकीत केलं होत की ती 32 व्या वर्षी लग्न करेल. यावर अमला हसली कारण त्यावेळी तिचा बॉयफ्रेंडही नव्हता. पण काही दिवसांनी ती गोव्यात जगतला भेटली, प्रेमात पडली आणि लग्न झालं तेव्हा ती 32 वर्षांची होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नानंतर 2 वर्षांत घटस्फोट! आयुष्यात नवा बॉयफ्रेंड, 1 महिन्यात प्रेग्नंट झाली अभिनेत्री; केलं दुसरं लग्न