TRENDING:

देशातील सर्वात मोठा सुपरस्टार कोण? शाहरुख, सलमान नाही हा अभिनेता बनला हिरो नंबर वन

Last Updated:
Indias Biggest Superstar : देशातील सर्वात मोठा सुपरस्टार कोण आहे? शाहरुख सलमानचा विचार करत असाल तर तुमचा अंदाज चुकतोय.
advertisement
1/11
देशातील सर्वात मोठा सुपरस्टार कोण? शाहरुख, सलमान नाही हा अभिनेता बनला हिरो नंबर
भारतात हिंदी, मराठी, साऊथ सिनेसृष्टी आहे आणि यात अनेक अभिनेते आहेत. अनेक सुपरस्टार्स आहेत. प्रत्येक इंडस्ट्रीत सुपरस्टार आहे. पण देशातील सर्वात मोठा सुपरस्टार कोण आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का! सुपरस्टार म्हटलं की आपल्याला आधी सलमान, शाहरूख यांची नाव समोर येतात. पण आता जमाना बदलला आहे. Ormax Media ने नुकतीच जाहीर केलेल्या Ormax Stars India Loves च्या यादीमुळे सर्वात मोठा सुपरस्टार कोण? याचं उत्तर मिळालं आहे.
advertisement
2/11
दहाव्या क्रमांकावर अभिनेता अक्षय कुमार आहे. वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी अक्षय अजूनही फिट आहे. त्याची अ‍ॅक्शन- कॉमेडी स्टाइल प्रेक्षकांना आवडते.
advertisement
3/11
नवव्या क्रमांकावर सलमान खान आहेत. सलमान खान फार सिनेमात काम करत नाही. त्याचे सिनेमे फार खास कमाई करत नाहीत. पण त्याचं स्टारडम अजूनही कायम आहे.
advertisement
4/11
आठव्या क्रमांकावर Jr NTR आहे. अभिनयासोबतच ज्युनियर एनटीआर त्याच्या डान्समुळे देशभरात प्रसिद्ध आहे. आरआरआरनंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली.
advertisement
5/11
अभिनेता राम चरण सातव्या क्रमांकावर आहे. RRR ग्लोबल यशानंतर त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्याचा शांत स्वभाव चाहत्यांना नेहमीच आवडतो.
advertisement
6/11
सहाव्या क्रमांकावर अभिनेता अजित कुमार आहे. सोशल मीडिया प्रमोशनशिवायही त्यांची अफाट लोकप्रियता आहे. तमिळनाडूसह देशभरात त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्सचे चाहते आहेत.
advertisement
7/11
पाचव्या क्रमांकावर अभिनेता महेश बाबू आहे. त्याच्या चार्मिंग पर्सनॅलिटीमुळे तो साऊथमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांनी आतापर्यंत एकही हिंदी सिनेमा केला नाही पण तिथे त्याची प्रचंड फॅनफॉलोविंग आहे.
advertisement
8/11
चौथ्या क्रमांकावर शाहरुख खानचं नाव आहे. किंग खानचं नाव केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. डिसेंबर महिन्यात तो किंग बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
9/11
तिसऱ्या क्रमांकावर पुष्पा स्टार अल्लू अर्जुन आहे. अल्लू अर्जुनने लोकप्रियतेच्या बाबतीत शाहरुख खानला देखील मागे टाकलं आहे.
advertisement
10/11
दुसऱ्या क्रमांकावर थलपती विजय आहे. विजयने इंडस्ट्री सोडून राजकारणार एन्ट्री केली आहे. पण त्याच्या प्रचंड फॅन फॉलोइंगमुळे तो कायम चर्चेत असतो.
advertisement
11/11
या यादीत पहिल्या क्रमांकावर बाहुबली फेम अभिनेता प्रभास आहे. 'बाहुबली'नंतर त्यांच्या काही चित्रपटांना अपेक्षित यश मिळालं नाही. पण आजही त्याची प्रचंड लोकप्रियता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
देशातील सर्वात मोठा सुपरस्टार कोण? शाहरुख, सलमान नाही हा अभिनेता बनला हिरो नंबर वन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल