नेमका प्रकार काय?
आरोपी दिलीप नंबुरी कंडाथील (५६) हा रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास त्याची पत्नी बिंदू (५३) झोपेत असताना, दिलीप याने त्यांच्या चेहऱ्यावर ब्लँकेट टाकून नाक आणि तोंड दाबलं. श्वास गुदमरल्याने बिंदू यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रात्रभर पत्नीच्या मृतदेहाशेजारी बसून राहिल्यानंतर, मंगळवारी सकाळी ८ वाजता त्याने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे अनेक कारणे समोर आली आहेत. बिंदू या नैराश्यावर उपचार घेत होत्या. पती त्याच्या पहिल्या पत्नीला भेटत असल्याचा त्यांना संशय होता, त्यावरून त्यांच्यात सतत भांडणे होत असत. यासोबतच रिअल इस्टेट व्यवसायात मोठे नुकसान झाल्यामुळे दिलीप कर्जबाजारी झाला होता आणि मानसिक तणावाखाली होता. रोजच्या कटकटीला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली त्याने दिली आहे.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंग कदम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दिलीप याने शांतपणे पोलिसांना घरात नेले आणि बेडरूममधील मृतदेह दाखवला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या घटनेने खडकी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
