TRENDING:

Valentine Day 2026 Horoscope: प्रपोज करायला जाल आणि..! 'व्हॅलेंटाईन डे' कोणत्या राशीसाठी कसा असेल?

Last Updated:
Valentine Day 2026 Horoscope: व्हॅलेंटाईन डे निमित्त आजचं तुमचं लव्ह राशीभविष्य खालीलप्रमाणे आहे. आजचा दिवस एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्याचा आणि मनातलं प्रेम व्यक्त करण्याचा आहे.
advertisement
1/12
प्रपोज करायला जाल आणि..! 'व्हॅलेंटाईन डे' कोणत्या राशीसाठी कसा असेल?
मेष - जर तुमच्यात काही खटके उडाले असतील, तर ते मिटवण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जोडीदाराशी शांतपणे आणि समजुतीने बोला. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा ठरेल. मनातलं गुपित आज ओठावर येऊ द्या, तुमचे नाते अधिक घट्ट होईल.भाग्यशाली अंक 7, रंग निळा
advertisement
2/12
वृषभ - आजच्या दिवसात तुम्हाला खऱ्या प्रेमाची जाणीव होईल आणि काही गोड आठवणी तयार होतील. संकोच न करता मनातल्या भावना बोलून दाखवा. तुमच्या जोडीदारासाठी हा वेळ खूप मोलाचा आहे. प्रेमाचा हा प्रवास आनंदाने जगा.भाग्यशाली अंक 12, रंग गडद हिरवा
advertisement
3/12
मिथुन - जर तुम्ही सिंगल असाल, तर नवीन नात्यात उडी मारण्यापूर्वी थोडा विचार करा. घाई न करता आधी स्वतःच्या मनाचा अंदाज घ्या. ग्रहांची स्थिती आज थोडी धरसोडीची आहे, त्यामुळे कोणत्याही दबावाखाली न येता शांत राहा.भाग्यशाली अंक 6, रंग जांभळा
advertisement
4/12
कर्क - जोडीदाराच्या मनाचा विचार करा आणि त्यांना समजून घ्या. साध्या साध्या गोष्टींवरून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. नात्याची वीण घट्ट करण्यासाठी आज तुम्हाला थोडं संवेदनशील राहावं लागेल. विचार करून बोला आणि समोरच्याचं म्हणणंही ऐकून घ्या.भाग्यशाली अंक 11, रंग काळा
advertisement
5/12
सिंह - जर तुम्हाला कोणाला प्रपोज करायचं असेल, तर आजचा दिवस एकदम भारी आहे. मनातलं बोलायला अजिबात घाबरू नका. आजचा दिवस तुमच्या नात्यात गोडवा आणि विश्वास घेऊन येईल. प्रेमाचा अनुभव आज खूप सुखद असेल.भाग्यशाली अंक 5, रंग गुलाबी
advertisement
6/12
कन्या - जोडीदाराला खुश करण्यासाठी आज तुम्ही काहीतरी खास करू शकता. एखादं रोमँटिक डिनर किंवा छोटीशी ट्रीप तुमच्या नात्यात नवा उत्साह भरेल. नात्यात जिव्हाळा टिकवण्यासाठी तुम्ही केलेले छोटे छोटे प्रयत्नही मोठे बदल घडवून आणतील.भाग्यशाली अंक 14, रंग पिवळा
advertisement
7/12
तूळ - आज प्रेमाच्या बाबतीत थोडी ओढाताण होऊ शकते, पण संयम ठेवलात तर सगळं निवळेल. या परिस्थितीकडे एक शिकण्याची संधी म्हणून बघा. मनात काही शंका असेल तर ती जोडीदाराला बोलून दाखवा, संवादामुळे नातं अधिक स्वच्छ होईल.भाग्यशाली अंक 15, रंग लाल
advertisement
8/12
वृश्चिक - रिलेशन सुधारण्यासाठी सकारात्मक राहा आणि खरं बोला. तुमच्या लव्ह लाईफसाठी आजचा काळ खूप आनंदाचा आहे. आज मिळणाऱ्या संधींचा मनमुराद आनंद घ्या. तुम्ही जितकं मोकळेपणाने बोलाल, तितकं तुमचं नातं बहरत जाईल.भाग्यशाली अंक 1, रंग नेव्ही ब्लू
advertisement
9/12
धनु - आज तुमचा जोडीदार थोडा नाराज किंवा उदास असू शकतो, त्यांना तुमच्या आधाराची गरज भासेल. अशा वेळी शांत राहून त्यांना समजून घेणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात ही जाणीव त्यांना करून द्या.भाग्यशाली अंक 3, रंग नारंगी
advertisement
10/12
मकर - आजचा दिवस थोडा कठीण असला तरी, यामुळे तुमचं नातं अधिक पक्कं व्हायला मदत होईल. समस्यांपासून पळण्यापेक्षा त्या मिळून सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रेमात प्रामाणिक राहणं सर्वात महत्त्वाचं आहे. संवाद थांबू देऊ नका.भाग्यशाली अंक 17, रंग पांढरा
advertisement
11/12
कुंभ - आज तुमच्या प्रेमजीवनात काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. नात्याची पाळंमुळं घट्ट करण्यासाठी ही वेळ चांगली आहे. मनातलं सांगायला मागे-पुढे पाहू नका. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक आहे.भाग्यशाली अंक 9, रंग मरून
advertisement
12/12
मीन - या राशीचे जे सिंगल आहेत त्यांनी आज मनातील भावना सांगायला हरकत नाही. तुमचे मन मोकळे करण्याची हीच ती वेळ. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात काहीतरी रोमांचक घेऊन येईल. तुमच्या मनातील सच्चेपणा समोरच्या व्यक्तीवर नक्कीच जादू करेल.भाग्यशाली अंक 10, रंग हिरवा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Valentine Day 2026 Horoscope: प्रपोज करायला जाल आणि..! 'व्हॅलेंटाईन डे' कोणत्या राशीसाठी कसा असेल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल