TRENDING:

Shukra Gochar 2026: मार्चच्या सुरुवातीला मोठा ग्रह धमाका! मालव्य राजयोगात 5 राशीच्या लोकांना लॉटरी

Last Updated:
Shukra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची स्थिती बदलणे ही केवळ खगोलीय घटना नसून त्याचा आपल्या आयुष्यात अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. दिनांका 2 मार्च 2026 रोजी शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हा प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांचा कारक मानला जातो. जेव्हा तो आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करतो, तेव्हा 'मालव्य राजयोग' तयार होतो. पंचमहापुरुष योगांपैकी हा एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली योग मानला जातो.
advertisement
1/6
मार्चच्या सुरुवातीला मोठा ग्रह धमाका! मालव्य राजयोगात 5 राशीच्या लोकांना लॉटरी
विशेष म्हणजे, यावेळी मीन राशीत आधीच शनिदेव विराजमान असतील आणि गुरुदेव मिथुन राशीत राहून केंद्र योग तयार करतील. ग्रहांची ही अनोखी जुळणी काही राशींच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणणारी ठरू शकते. प्रसिद्ध ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्या माहितीनुसार, शुक्र गोचर 2026 मुळे नेमका कोणाला फायदा होणार आहे, ते पाहुया..
advertisement
2/6
वृष राशीच्या लोकांसाठी शुक्र 11 व्या स्थानी म्हणजेच लाभ स्थानी गोचर करणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या उत्पन्नावर आणि ओळखीच्या वर्तुळावर होईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे किंवा पगार वाढण्याचे उत्तम संकेत आहेत. जे लोक व्यवसायात आहेत, त्यांना नवीन प्रोजेक्ट्स आणि मोठे ग्राहक मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळाल्याने तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी हा काळ स्थैर्य घेऊन येईल.
advertisement
3/6
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र 10 व्या स्थानी म्हणजेच करिअरच्या स्थानी असेल. यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व वाढेल. तुमच्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि पदोन्नतीचे योग जुळून येतील. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या तुमच्या योजना यशस्वी होतील. फक्त एक काळजी घ्या, जसं उत्पन्न वाढेल तसे तुमचे खर्चही वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन नीट करा.
advertisement
4/6
कर्क राशीच्या लोकांसाठी हे गोचर 9 व्या स्थानी म्हणजेच भाग्याच्या स्थानी होणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यामुळे तुमची रखडलेली कामं आता मार्गी लागतील. अचानक धनलाभाचे योग असून जुने अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील आणि जोडीदाराची तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ मिळेल.
advertisement
5/6
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र 7 व्या स्थानी म्हणजेच भागीदारी आणि वैवाहिक आयुष्याच्या स्थानी गोचर करेल. नोकरीत वरिष्ठ अधिकार्यांचं सहकार्य लाभल्यामुळे तुमची कामं सोपी होतील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल, तर पार्टनरसोबतचे संबंध सुधारतील आणि व्यवसायात नफा होईल. जे अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. प्रवासावर थोडा जास्त खर्च होण्याची शक्यता असल्याने खिशावर ताबा ठेवा.
advertisement
6/6
मीन राशीच्या स्वतःच्या राशीतच म्हणजेच लग्न स्थानी शुक्राचा प्रवेश होणार आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक दिसून येईल. व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे तुमचं पद उंचावेल. वैवाहिक आयुष्यात गोडवा निर्माण होईल आणि तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा जास्त मजबूत होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shukra Gochar 2026: मार्चच्या सुरुवातीला मोठा ग्रह धमाका! मालव्य राजयोगात 5 राशीच्या लोकांना लॉटरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल