Weekly Horoscope: मेष ते मीन राशींचे साप्ताहिक! सालातील शेवटचा पूर्ण आठवडा कोणासाठी भाग्याचा?
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: श्री नृसिंह सरस्वती जयंतीपासून सुरू होणारा डिसेंबरचा चौथा आठवडा अनेक राशींसाठी खास असेल. हा डिसेंबरचा शेवटचा पूर्ण आठवडा असेल, ग्रहांची स्थिती काही भाग्यवान राशींच्या पत्थावर पडणार आहे. मेष ते मीन सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/12

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल. या आठवड्यात पैशांची आवक कमी आणि खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकतं. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास अपेक्षेपेक्षा कमी फळदायी ठरू शकतात. मात्र, हा व्यवसायाचा एक भाग आहे आणि ही परिस्थिती जास्त काळ टिकणार नाही. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसाय पुन्हा रुळावर येताना दिसेल. नोकरी करणाऱ्यांना आपलं काम वेळेत आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याची गरज आहे. या आठवड्यात आरोग्य आणि नात्यांकडे विशेष लक्ष द्या. आठवड्याचा पूर्वार्ध नात्यांच्या बाबतीत थोडा प्रतिकूल असू शकतो. प्रियजनांशी मतभेद होऊ शकतात, पण उत्तरार्धात एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मध्यस्थीमुळं गैरसमज दूर होतील. उत्तरार्धात कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकता. प्रेमसंबंधांसाठी ही वेळ अनुकूल राहील.लकी रंग: निळा लकी अंक: 15
advertisement
2/12
वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात जीवनातील कोणत्याही क्षेत्रात मोठं पाऊल उचलण्यापूर्वी नीट विचार करणं योग्य ठरेल. घाईघाईत किंवा गोंधळलेल्या स्थितीत काम केल्यास मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागू शकतं. या आठवड्यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल. आठवड्याच्या सुरुवातीला एखादी महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते, ज्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. पूर्वार्धात नियोजित कामं संथ गतीने पूर्ण होतील आणि कामाच्या व्यापामुळं खूप धावपळ होईल. मेहनतीनुसार यश न मिळाल्यास थोडं नैराश्य येऊ शकतं. नोकरीत वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशी चांगलं ताळमेळ राखणं हिताचं ठरेल. पैशांच्या व्यवहारात खूप सावधगिरी बाळगा आणि या आठवड्यात कोणालाही कर्ज देणं टाळा.लकी रंग: पिवळा लकी अंक: 5
advertisement
3/12
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा गेल्या आठवड्यापेक्षा अधिक शुभ आणि फायदेशीर आहे. आठवड्याच्या सुरुवातीला एखादी महत्त्वाची चांगली बातमी मिळू शकते. जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचा विचार करत असाल, तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीतील अडचणी दूर होतील. नोकरीत परिस्थिती अनुकूल राहील आणि उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. बेरोजगारांना हवी तशी नोकरी मिळेल, तर नोकरीत असलेल्यांच्या बदली किंवा पदोन्नतीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि नियोजित कामं वेळेवर पूर्ण होऊन नफा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक सहलीचे किंवा पर्यटनाचे योग येतील. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत शुभ असेल. अविवाहितांचे विवाह जमू शकतात आणि जुनी प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.लकी रंग: नारंगी लकी अंक: 3
advertisement
4/12
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा ठरेल. या आठवड्यात जोखमीची कामं टाळावीत आणि आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवावं, कारण तुमचं वागणंच तुमच्या नफ्याला किंवा नुकसानाला कारणीभूत ठरेल. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी जुळवून घेणं योग्य राहील. ऑफिसमध्ये लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कागदपत्रं वेळेवर पूर्ण करा, अन्यथा विनाकारण त्रास होऊ शकतो. नात्यांच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात थोडी प्रतिकूल असू शकते. कोणाशीही वाद घालणं टाळा, नाहीतर जुनी नाती तुटू शकतात. प्रेमसंबंधात विनाकारण प्रदर्शन किंवा दिखावा करू नका, अन्यथा सामाजिक बदनामीला सामोरं जावं लागू शकतं.लकी रंग: तपकिरी लकी अंक: 4
advertisement
5/12
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल. तुम्ही बराच काळ बेरोजगार असाल, तर या आठवड्यात मनासारखी नोकरी किंवा उत्पन्नाचं साधन मिळू शकतं. उच्च शिक्षण किंवा परदेशातील व्यवसायासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील. परदेश प्रवासातून किंवा त्यासंबंधित कामातून धनलाभाचे योग आहेत. आयुष्यात पुढं जाण्यासाठी मोठ्या संधी मिळतील. सरकारी कामात असलेल्या लोकांशी तुमचे संबंध येतील आणि त्यांच्या मदतीनं प्रलंबित कामं पूर्ण होतील. राजकारण किंवा समाजसेवेशी संबंधित असाल, तर तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढेल. समाजात तुमची कीर्ती पसरेल. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा पूर्णपणे अनुकूल आहे. जोडीदाराशी चांगलं ट्युनिंग राहील आणि वैवाहिक आयुष्य सुखी असेल. उत्तरार्धात जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाचे योग आहेत. आरोग्य सामान्य राहील.लकी रंग: क्रीम लकी अंक: 9
advertisement
6/12
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम असेल. आठवड्याच्या सुरुवातीला नियोजित कामं पूर्ण करण्यात काही अडचणी येऊ शकतात. नातेवाईकांकडून अपेक्षेनुसार मदत न मिळाल्यानं थोडं वाईट वाटू शकतं. प्रयत्नांचं फळ न मिळाल्यानं मनात खिन्नता येऊ शकते. पूर्वार्धात केवळ नात्यांच्या बाबतीतच नाही तर आरोग्याच्या बाबतीतही काळजी घेण्याची गरज आहे. जुने आजार किंवा हंगामी आजार डोकं वर काढू शकतात. या आठवड्यात वाहन चालवताना अत्यंत सावध राहा, दुखापत होण्याची शक्यता आहे. नोकरीत अचानक होणाऱ्या बदलांमुळे अडचणी येऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित असाल, तर कोणतीही जोखीम घेणं टाळा. मुलांशी संबंधित समस्या काळजीत टाकू शकतात. प्रतिकूल परिस्थितीत जोडीदाराची साथ तुम्हाला आधार देईल.लकी रंग: गुलाबी लकी अंक: 10
advertisement
7/12
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जीवनात नवीन संधी घेऊन येईल. नशीब तुमच्या दारावर दस्तक देईल, पण त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवावा लागेल. जे परदेशात शिक्षण किंवा व्यवसायासाठी जाण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मोठं यश मिळू शकतं. परदेशी व्यापाराशी संबंधित असलेल्यांसाठी हा आठवडा शुभ आहे. नोकरीत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. हव्या त्या ठिकाणी बदली किंवा सन्मानाचं पद मिळण्याची इच्छा पूर्ण होईल. नात्यांच्या बाबतीत वेळ अनुकूल आहे, भावंडांशी आणि पालकांशी संबंध मधुर राहतील. उत्तरार्धात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळं घरात आनंदाचं वातावरण असेल. प्रेमसंबंध मजबूत होतील आणि जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. आरोग्य सामान्य राहील.लकी रंग: काळा लकी अंक: 1
advertisement
8/12
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असेल. या आठवड्यात कोणतीही जोखीम घेणं किंवा नियम मोडणं टाळावं, अन्यथा विनाकारण अडचणीत येऊ शकता. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी खोट्याचा आधार घेऊ नका, अन्यथा मानहानी सहन करावी लागेल. भावनेच्या भरात किंवा दबावाखाली कोणासाठीही खोटी साक्ष देण्याची चूक करू नका, अन्यथा कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतील. व्यवसायात स्पर्धकांशी कडवी झुंज द्यावी लागेल आणि बाजारपेठेत आपली विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बाजारात अडकलेले पैसे काढण्याबाबत चिंता वाटू शकते. वैयक्तिक आयुष्यात असलेल्या समस्यांवर उत्तरार्धात काहीतरी तोडगा निघेल. ज्येष्ठ व्यक्ती किंवा जवळच्या मित्राच्या मदतीने नातेवाईकांमधील गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधात सावधगिरीने पावलं उचला आणि घाईत चूक करू नका.लकी रंग: मरून लकी अंक: 12
advertisement
9/12
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा आहे. या आठवड्यात आळस आणि अहंकार या दोन्ही गोष्टी टाळण्याची गरज आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांचा ओझं वाढेल, ज्या तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडाव्या लागतील. समस्यांवर चिंता करण्याऐवजी चिंतन करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. विशेषतः करिअरमध्ये कष्ट करूनही मध्यम निकाल मिळत असतील, तर टीकाकारांकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष द्या. जर तुम्ही तुमचं काम वेळेत आणि बिनचूक पूर्ण केलंत, तर तुम्ही हरलेली बाजी सुद्धा जिंकू शकाल. उत्तरार्ध आरोग्य आणि नात्यांच्या बाबतीत थोडा प्रतिकूल असू शकतो. अशा वेळी विनाकारण ताण घेऊ नका आणि दिनचर्या नीट ठेवा. आर्थिक संकट टाळण्यासाठी विचारपूर्वक खर्च करा. नात्यात संवाद वाढवा आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.लकी रंग: जांभळा लकी अंक: 6
advertisement
10/12
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही मोठे खर्च समोर येऊ शकतात, ज्यामुळे बजेट बिघडू शकतं. घराची दुरुस्ती, मुलांचं शिक्षण किंवा उपचारांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांना टार्गेट पूर्ण करण्याचं आव्हान असेल. वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं अपेक्षित सहकार्य न मिळाल्यानं मन अस्वस्थ होऊ शकतं. या आठवड्यात शॉर्टकटने पैसे मिळवण्याचा किंवा अर्धवट कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल, तर हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावू शकते. स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्या. ताणतणाव आणि रक्तदाबासारख्या समस्या टाळण्यासाठी नियमित ध्यान करा आणि दिनचर्या नीट ठेवा.
advertisement
11/12
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आणि दिलासादायक असेल. बराच काळ रखडलेली कामं मित्र किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होतील. तुम्ही व्यावसायिक जीवनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल आणि मेहनतीच्या जोरावर आपली स्थिती मजबूत कराल. कामातील प्रगती आणि नफा पाहून आनंद होईल. घरगुती समस्या कमी होतील. कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमचा उत्साह आणि धैर्य वाढेल. उत्तरार्धात सुख-सोयींच्या वस्तूंवर मोठी रक्कम खर्च करू शकता. जमीन, घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल आणि जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक आयुष्यात मधुरता कायम राहील.लकी रंग: पांढरा लकी अंक: 2
advertisement
12/12
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि भाग्याचा आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला कामात अपेक्षित यश आणि नफा मिळेल. करिअर आणि व्यवसायात पुढं जाण्याच्या मोठ्या संधी मिळतील. मित्र, वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची कामं वेळेत पूर्ण करू शकाल. आठवड्याच्या मध्यावर पदोन्नतीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी व्यवसायाशी संबंधित मोठा करार होऊ शकतो. धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमची महत्त्वाची भूमिका असेल. एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीचा आशीर्वाद मिळेल. कायमस्वरूपी मालमत्ता किंवा भौतिक सुख-साधने मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा अनुकूल राहील. प्रेमसंबंध मधुर राहतील आणि वैवाहिक आयुष्य सुखी असेल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासह सहलीचा बेत आखला जाऊ शकतो.लकी रंग: राखाडी लकी अंक: 11
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: मेष ते मीन राशींचे साप्ताहिक! सालातील शेवटचा पूर्ण आठवडा कोणासाठी भाग्याचा?