TRENDING:

Tea Science : गरम चहा फुंकून प्यायल्याने खरंच थंड होतो का? की हा फक्त आपला भास आहे? यामागचं सायन्स समजून घ्या

Last Updated:
आपल्या तोंडातून निघणाऱ्या हवेमुळे खरंच चहा थंड होतो की हा फक्त आपला एक मानसिक भास आहे? जर तुम्हाला वाटत असेल की हा फक्त भास आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. यामागे विज्ञानाचे एक ठोस कारण दडलेले आहे.
advertisement
1/7
गरम चहा फुंकून प्यायल्याने खरंच थंड होतो का? की हा फक्त आपला भास आहे?
सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळची वेळ, वाफाळलेला चहा समोर आला की मन प्रसन्न होतं. अनेकांसाठी चहा म्हणजे अमृतच आहे. डोकेदुखीपासून ते दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी लोक चहा पितात. पण हा चहा अनेकदा लोक थोडा थंड करुन किंवा फुंकून पितात आणि मग तो पितो.
advertisement
2/7
लहानपणापासून आपण हे करत आलो आहोत आणि आजूबाजूला लोकांना देखील आपण हे करताना पाहिलं आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, आपल्या तोंडातून निघणाऱ्या हवेमुळे खरंच चहा थंड होतो की हा फक्त आपला एक मानसिक भास आहे? जर तुम्हाला वाटत असेल की हा फक्त भास आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. यामागे विज्ञानाचे एक ठोस कारण दडलेले आहे.
advertisement
3/7
चहावर फुंकर मारल्याने नक्की काय घडतं?जेव्हा आपण चहावर फुंकर मारतो, तेव्हा विज्ञानातील 'बाष्पीभवन' (Evaporation) आणि 'कन्व्हेक्शन' (Convection) या दोन प्रक्रिया वेगाने घडून येतात. विश्वसनीय वैज्ञानिक सिद्धांतांनुसार हे कसे घडते ते पाहूया:
advertisement
4/7
1. बाष्पीभवनाचा वेग वाढतो (Evaporation Rate)गरम चहाच्या वरच्या पृष्ठभागावर वाफेचा एक थर साचलेला असतो. ही वाफ म्हणजे चहातील सर्वात गरम पाण्याचे रेणू असतात. जोपर्यंत हा वाफेचा थर चहाच्या वर असतो, तोपर्यंत चहातील उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. जेव्हा आपण फुंकर मारतो, तेव्हा आपण हा वाफेचा थर बाजूला सारतो. यामुळे चहामधील अधिक उष्णता वाफेच्या स्वरूपात बाहेर पडायला जागा मिळते आणि चहा लवकर थंड होतो.
advertisement
5/7
2. उष्णतेचे वहन (Heat Transfer)विज्ञानाचा नियम सांगतो की, उष्णता नेहमी गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते. चहाचे तापमान जास्त असते आणि आपण फुंकर मारतो ती हवा त्यामानाने थंड असते. जेव्हा आपण फुंकर मारतो, तेव्हा चहाच्या संपर्कात सतत नवीन 'थंड' हवा येते, जी चहामधील उष्णता शोषून घेते आणि चहाचे तापमान कमी करते.
advertisement
6/7
बशीत चहा ओतल्याने तो अधिक लवकर थंड का होतो?अनेकदा आपण घाईत असताना कपामधून चहा बशीत (Saucer) ओततो. यामागेही एक विज्ञान आहे. कपाचा वरचा भाग लहान असतो, त्यामुळे बाष्पीभवनासाठी कमी जागा मिळते. मात्र, बशीचा पृष्ठभाग (Surface Area) मोठा असतो. पृष्ठभाग जेवढा मोठा, तेवढा बाष्पीभवनाचा वेग जास्त. यामुळे बशीतील चहा कपापेक्षा कितीतरी पतीने लवकर थंड होतो.
advertisement
7/7
चहा जास्त फुंकून पिण्याचे तोटे?आयुर्वेदात आणि काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहावर खूप जोरात फुंकर मारणे नेहमीच चांगले नसते. याचे कारण असे की, कार्बन डायऑक्साइड. आपण जेव्हा श्वास सोडतो, तेव्हा त्यात कार्बन डायऑक्साइड असतो. फुंकर मारताना तो चहाच्या पाण्यात मिसळल्यास चहाच्या आम्लतेवर (Acidity) थोडा परिणाम होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tea Science : गरम चहा फुंकून प्यायल्याने खरंच थंड होतो का? की हा फक्त आपला भास आहे? यामागचं सायन्स समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल