IND vs PAK : पाकिस्तान विरूद्ध सामन्याआधी टीम इंडियाला वॉर्निंग,
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
श्रीलंकेच्या कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअमवर येत्या 15 फेब्रुवारी 2026 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे.
advertisement
1/8

श्रीलंकेच्या कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअमवर येत्या 15 फेब्रुवारी 2026 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे.या सामन्याची जगभरातील क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/8
खरं तर या सामन्यावर बहिष्काराचा सावट होतं. बांगलादेशला स्पर्धेबाहेर केल्याने पाकिस्तानने भारता विरूद्ध सामन्यात बहिष्काराची भूमिका घेतली होती.पण तीनही बोर्डाच्या बैठकीनंतर अखेर या सामन्यावर तोडगा काढण्यात आला आहे.
advertisement
3/8
विशेष म्हणजे पाकिस्तानने स्वत: हून या सामन्याला होकार दिला नाही आहे. कारण जगाला पाकिस्तानने माघार घेतल्याचे दिसेल त्यामुळे पाकिस्तानने श्रीलंका आणि बांगलादेशच्या आग्रहाखातर भारताविरूद्ध सामन्यात खेळायची तयारी दाखवली होती.
advertisement
4/8
दरम्यान या सामन्यावर आता क्रिकेट वर्तुळात अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. काही तर या सामन्यावर भविष्यवाणी देखील करत आहेत.
advertisement
5/8
अशात आता या हायव्होल्टेज सामन्याची उत्सुकता असताना आता टीम इंडियाचा माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंहने या सामन्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिकियेमध्ये त्याने टीम इंडियाला वॉर्निंग दिली आहे.
advertisement
6/8
पाकिस्तानकडे चांगले स्पिनर गोलंदाज आहे.पाकिस्तान स्पिनमध्ये चांगली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या स्पिनर गोलंदाजांविरूद्ध खेळताना सांभाळून खेळा,असा सल्ला हरभजन सिंहने दिला आहे.
advertisement
7/8
भारत हा सामना नक्कीच जिंकेल. भारत हा सामना जिंकण्याची प्रमुख दावेदार आहे, असे देखील हरभजन सिंह म्हणाला आहे.
advertisement
8/8
भारत जशी आतापर्यंत खेळत आली आहे, तसेच त्यांनी खेळावे. कोणताही दबाव न घेता मैदानात उतरा आणि भारताचा तिंरगा फडकवा,असे आवाहन देखील हरभजन सिंहने केले आहे.