कारमध्ये AC की खिडक्या उघड्या ठेवल्यावर, कुठे जास्त पेट्रोल खर्च होतं? उत्तर ऐकून तुम्हाला शॉक बसू शकतो
- Published by:Devika Shinde
Last Updated:
AC लावल्यावर लगेच डोक्यात विचार येतो की, यामुळे गाडीचं मायलेज तर कमी होणार नाही ना? काही लोक पेट्रोल वाचवण्यासाठी चक्क उन्हात खिडक्या उघड्या ठेवून गाडी चालवतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की असं करुन तुम्ही काही मायलेज किंवा पेट्रोल वाचवत नाही आहात..
advertisement
1/7

उन्हाळ्याचा तडाखा वाढला की कारमध्ये बसल्या बसल्या आपण सगळ्यात आधी काय करतो? तर AC फुलवर सुरू करतो. पण लगेच डोक्यात विचार येतो की, यामुळे गाडीचं मायलेज तर कमी होणार नाही ना? काही लोक पेट्रोल वाचवण्यासाठी चक्क उन्हात खिडक्या उघड्या ठेवून गाडी चालवतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की असं करुन तुम्ही काही मायलेज किंवा पेट्रोल वाचवत नाही आहात... हो तुम्ही बरोबर वाचलत. गाडीत एसी बंद करुन काचा सुरु करुन तुम्ही हायवेवर गाडी चालवत असाल तर तुम्ही उलट जास्तच पेट्रोल खर्च करत आहात. हे कसं शक्य आहे आणि आम्ही असं का म्हणतोय चला समजून घेऊ.
advertisement
2/7
एसी सुरू केल्यावर नक्की काय होतं?जेव्हा तुम्ही कारचा एसी सुरू करता, तेव्हा इंजिनला अल्टरनेटर आणि एसी कॉम्प्रेसर चालवण्यासाठी अतिरिक्त ताकद लावावी लागते. यामुळे इंजिनवर लोड येतो आणि साहजिकच पेट्रोलचा वापर 5% ते 20% पर्यंत वाढू शकतो. हे प्रामुख्याने तुम्ही गाडी शहरात चालवत आहात की हायवेवर, यावर अवलंबून असतं.
advertisement
3/7
खिडकी उघडी ठेवून गाडी चालवणं फायद्याचं आहे का?अनेकांना वाटतं की खिडक्या उघड्या ठेवल्याने एसीचा वापर टळतो आणि पेट्रोल वाचतं. पण इथे एअरोडायनॅमिक्सचा नियम लागू होतो. जेव्हा गाडी वेगात असते (उदा. 60-80 किमी प्रति तास पेक्षा जास्त), तेव्हा खिडक्यांतून हवा आत शिरते आणि गाडीला मागे खेचते. याला ड्रॅग इफेक्ट म्हणतात. हा ड्रॅग कमी करण्यासाठी इंजिनला अधिक मेहनत करावी लागते आणि पुढे जात रहावंसं वाटतं, ज्यामुळे एसी सुरू ठेवण्यापेक्षाही जास्त पेट्रोल खर्च होऊ शकतं.
advertisement
4/7
मायलेजवर कधी जास्त परिणाम होतो?शहरातील ट्रॅफिकमध्ये: जर तुम्ही शहरात कमी वेगाने (40 किमी पेक्षा कमी) गाडी चालवत असाल, तर एसी सुरू केल्यावर मायलेजवर जास्त परिणाम होतो. अशा वेळी खिडक्या उघड्या ठेवणं पेट्रोल वाचवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
5/7
हायवेवर: जर तुम्ही हायवेवर वेगाने गाडी चालवत असाल, तर एसी सुरू ठेवून खिडक्या बंद ठेवणं कधीही चांगलं. यामुळे गाडीचा वेग कायम राहतो आणि पेट्रोलची बचत होते.
advertisement
6/7
प्रसिद्ध Society of Automotive Engineers (SAE) ने केलेल्या एका अभ्यासानुसार, "वाहन जेव्हा जास्त वेगाने धावते, तेव्हा उघड्या खिडक्यांमुळे निर्माण होणारा हवेचा अडथळा हा एसी चालवण्यामुळे इंजिनवर येणाऱ्या लोडापेक्षा जास्त असतो. त्यामुळे हायवेवर एसी वापरणे हे खिडक्या उघड्या ठेवण्यापेक्षा अधिक इंधनक्षम ठरते."
advertisement
7/7
पेट्रोल वाचवण्यासाठी या 5 खास टिप्स:1. गाडी सावलीत पार्क करा: गाडी आधीच थंड असेल तर एसीला केबिन थंड करण्यासाठी कमी मेहनत लागते.2. सुरुवातीला खिडक्या उघडा: गाडी सुरू केल्यावर लगेच एसी लावण्याऐवजी, एक-दोन मिनिटे खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून गरम हवा बाहेर जाईल.3. एसी सर्व्हिसिंग: वेळेवर एसी गॅस टॉप-अप आणि फिल्टर साफ केल्याने इंजिनवर कमी ताण पडतो.4. योग्य तापमान: एसी 18°C वर ठेवण्याऐवजी 24°C वर सेट करा. यामुळे कॉम्प्रेसरवर लोड कमी येतो.5. हायवेवर खिडक्या बंद ठेवा: सुरक्षितता आणि इंधन बचत या दोन्हीसाठी हायवेवर एसी वापरणेच योग्य आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
कारमध्ये AC की खिडक्या उघड्या ठेवल्यावर, कुठे जास्त पेट्रोल खर्च होतं? उत्तर ऐकून तुम्हाला शॉक बसू शकतो