पेट्रोल पंपाकडे बघायचं काम नाही! 330 किमी मायलेज अन् किंमतही कमी; देशातली एकमेव Bike
- Published by:Sachin S
Last Updated:
हल्ली ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जास्त मायलेजची बाईक घेण्याकडे कल असतो. त्यात बजाजची Bajaj Freedom 125 ही बाईक जगातली पहिली CNG बाईक आहे. या बाईकचं मायलेज हे तब्बल ३३० किमी इतकं मायलेज देते, त्यामुळे देशातली ही मायलेज किंग बाईक ठरली आहे.
advertisement
1/7

सध्या इंधनाच्या दरात वाढ होण्याची चिन्ह आहे, त्यातच पेट्रोलचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना दुसरा धक्का बसला आहे. एवढंच नाहीतर आखाती देशात युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोल पंपावर आतापासूनच रांगा लागायला लागल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत उत्तम मायलेजच्या गाड्या या सगळ्यात फायदेशीर ठरतात. हल्ली ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जास्त मायलेजची बाईक घेण्याकडे कल असतो. त्यात बजाजची Bajaj Freedom 125 ही बाईक जगातली पहिली CNG बाईक आहे. या बाईकचं मायलेज हे तब्बल ३३० किमी इतकं मायलेज देते, त्यामुळे देशातली ही मायलेज किंग बाईक ठरली आहे.
advertisement
2/7
Bajaj Freedom 125 CNG ने मागील वर्षी मोठ्या दणक्यात ही बाईक लाँच केली होती. आजही मार्केटमध्ये या बाईकचा वेगळाच दबदबा आहे. बजाज ब्रँड असल्यामुळे शुन्य मेटेन्स खर्च आहे. त्यात बाईकची किंमत कमी आणि पेट्रोल आणि सीएनजी मिळून ३३० किमी इतकं मायलेज सहज मिळतं.
advertisement
3/7
Bajaj Freedom 125 CNG मध्ये सीएनजी टाकी ही सीट खाली दिली आहे. एकाचवेळी २ किली सीएनजी या बाईकमध्ये भरता येतोय. तसंच समोर पेट्रोलची टाकीही दिली आहे. त्यामुळे तुम्हाला पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही प्रकारावर बाईक चालवू शकतात.
advertisement
4/7
Bajaj Freedom 125 CNG मध्ये १२४.६ cc चं एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिलं आहे. जे सीएनजी मोडमध्ये ९.५ PS पॉवर आणि ९.७ Nm टॉर्क जनरेट करतो. या बाइकचा टॉप स्पीड सीएनजीवर जवळपास ९०.५ किमी इतका स्पीड आहे. तर पेट्रोलवर ९३.४ किमी इतका स्पीड आहे. यामध्ये ड्युअल फ्यूल सिस्टम दिली आहे.
advertisement
5/7
Bajaj Freedom 125 CNG जर पेट्रोल मोड वर चालवली तर ६५ किमी इतकं मायलेज देते . त्याच जागी Bajaj Freedom 125 CNG जर सीएनजी मोडमध्ये चालवली तर १०२ किमी एका किलोसाठी मायलेज देते. या बाईकमध्ये २ किलोच्या सीएनजी टाकी आहे, त्यामुळे जवळपास २०० किमी मायलेज हे सीएनजीवर मिळतं. आता पेट्रोल आणि सीएनजी मिळून ३३० किमी इतकं मायलेज कंपनी दावा करत आहे.
advertisement
6/7
Bajaj Freedom 125 CNG च्या फिचर्समध्येही काही कमी नाही. यामध्ये एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ट्युबलेस टायर आणि कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम असे फिचर्स दिले आहे. Bajaj Freedom 125 CNG चं वजन १४७.८ किलो असून सीटची उंची ८२५ मिमी आहे. जी सगळ्या उंचीच्या माणसासाठी आरामदायक आहे.
advertisement
7/7
Bajaj Freedom 125 CNG च्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ३ व्हेरियंट दिले आहे. Bajaj Freedom 125 CNG चं बेस मॉडेल हे NG04 Drum स्वरुपात असून एक्स-शोरूम किंमत ९१,५६६ रुपये इतकी आहे. तर ड्रम एलईडीची किंमत १,०४,०५८ आणि टॉप डिस्क एलईडी व्हेरिएंटची किंमत १,०७,६१६ इतकी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
पेट्रोल पंपाकडे बघायचं काम नाही! 330 किमी मायलेज अन् किंमतही कमी; देशातली एकमेव Bike