TRENDING:

'या' स्पीडमध्ये जबरदस्त मायलेज देते तुमची कार! 99% ड्रायव्हर्सना माहितीच नाही

Last Updated:
Car milege: तुम्हीही या स्पीडवर कार चालवली तर तुम्हाला जबरदस्त मायलेज मिळेल. एवढंच नाही तर कारच्या इंजिनची लाइफही खुप जास्त वाढले.
advertisement
1/6
'या' स्पीडमध्ये जबरदस्त मायलेज देते तुमची कार! 99% ड्रायव्हर्सना माहितीच नाही
Car milege: जे लोक कार ड्रायव्हिंग करतात त्यांना नेहमी वाटत असतं की, कारचं मायलेज चांगलं असावं. जेणेकरुन इंधनाचा खर्च कमी होईल. अशावेळी त्यांना वाटते की स्लो स्पीडमध्ये कार चालवल्याने कार सर्वात जास्त मायलेज देते. पण असं असेल तर हे चुकीचं आहे. खरंतर जास्तीत जास्त कारसाठी बेस्ट मायलेज स्पीड ही 70 kmph ते 90 kmph दरम्यान असते.
advertisement
2/6
तुम्ही तुमची कार टॉप गियर (5th किंवा 6th गियर) मध्ये या स्टेबल स्पीडवर चालवतात. तेव्हा इंजिन सर्वात कमी RPM वर जास्त अंतर पार करते. रिचर्सनुसार या स्पीड रेजमध्ये गाडी चालवल्यावस तुम्ही सामान्य मायलेजमध्ये 15% ते 20% पर्यंत सुधारणा पाहू शकता. खरंतर काही आणखी गोष्टी आहेत, ज्याकडे लक्ष ठेवून तुम्ही कारचं मायलेज वाढवू शकता.
advertisement
3/6
योग्य गियर आणि इंजिन लोड समन्वय : वेग पुरेसा नाही, तर योग्य गियर निवडणे देखील महत्त्वाचे आहे. कमी वेगाने (जसे की 5th गियर 30 kmph वेगाने) मोठ्या गियरमध्ये गाडी चालवल्याने इंजिनवर भार पडतो, ज्यामुळे तेलाचा वापर वाढतो. इंजिनचा "स्वीट स्पॉट" म्हणजे ते कोणत्याही ताणाशिवाय सुरळीत चालते. इंधन वाया जाऊ नये म्हणून तुमचे इंजिन 2,000 RPMवर पोहोचताच नेहमी मोठ्या गियरमध्ये शिफ्ट करण्याचा प्रयत्न करा.
advertisement
4/6
हवेचा दाब आणि एयरोडायनामिक्स : एकदा तुम्ही 90 kmph वेगाने गाडी चालवली की, इंजिनसाठी हवेचा प्रतिकार हा एक मोठा अडथळा बनतो. 100-120 kmph वेगाने गाडी चालवल्याने इंजिनला हवा ओलांडण्यासाठी लक्षणीयरीत्या जास्त शक्ती वापरावी लागते, ज्यामुळे मायलेज थेट 25% पर्यंत कमी होऊ शकते. हायवेवर जास्त वेगाने खिडक्या उघड्या ठेवल्याने मायलेज देखील कमी होतो, कारण त्यामुळे कारमधील हवेचा दाब वाढतो आणि इंजिनचा ड्रॅग वाढतो.
advertisement
5/6
क्रूझ कंट्रोल आणि स्मूद ड्रायव्हिंग : वारंवार एक्सीलेटर दाबणे आणि ब्रेक मारणे हे मायलेज कमी होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. तुमच्या कारमध्ये Cruise Control फीचर असेल. तर हायवेवर ते 80 kmph वर सेट करा. यामुळे कारचे कंप्यूटर इंजिनला अचूक प्रमाणात इंधन पुरवता येते. अचानक गती वाढवण्याऐवजी हळूहळू गती वाढवणे तुमच्या बँक बॅलन्ससाठी आणि तुमच्या कारच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
advertisement
6/6
99% च्या सामान्य चुका : जास्तीत जास्त ड्रायव्हर्स एकतर शहराच्या ट्रॅफिकमध्ये खुप कमी गतीवर क्लच दाबत चालतात किंवा मग रस्ता मोकळा मिळताच 100 kmph च्या पार निघतात. या दोन्हीही स्थिती कारच्या शत्रू आहेत. या व्यतिरिक्त टायरमध्ये कमी हवेचा दाबही इंजिनवर जोर टाकतो. ज्यामुळे चांगली स्पीड असुनही मायलेज मिळू शकत नाही. तुमची कार 70-80 kmph दरम्यान ठेवा आणि वेळोवेळी सर्व्हिस करुन घ्या. असं केल्यास तुमची कार नेहमीच जबरदस्त मायलेज देईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
'या' स्पीडमध्ये जबरदस्त मायलेज देते तुमची कार! 99% ड्रायव्हर्सना माहितीच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल