Car Care Tips: मोठा खर्च टाळायचा असेल तर अवश्य लक्षात ठेवा या गोष्टी! कमी खर्चात होईल काम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Car Care Tips: कार चालवत असताना तिची काळजी घेणेही तितकीच महत्त्वाचे असते. टायर प्रेशर, ब्रेक, कूलेंट आणि सर्व्हिस शेल्यूड फॉलो केल्याने रिपेयर कॉस्ट 50-70% पर्यंत कमी होते आणि कारचे वय वाढते. चला काही टिप्स आणि ट्रिक्सविषयी सविस्तर जाणून घेऊया
advertisement
1/10

Car Care Tips: कारची नियमित देखभाल केल्याने तुम्ही महागड्या रिपेयर खर्चापासून सहज स्वतःचा बचाव करु शकता. आजकाल कार महाग झाल्या आहेत आणि त्याच्या सर्व्हिसिंगसाठीही लाखो रुपये लागतात. जसं की, इंजिन ओव्हररल, गियरबॉक्स रिपेयर किंवा सस्पेंशन बदलणे. खरंतर वेळोवेळी लहान-लहान गोष्टींकडे लक्ष ठेवले तर कारचीलाइफ वाढते. परफॉर्मेंस चांगला राहतो आणि अचानक मोठी समस्या येण्याची शक्यताही कमी होते.
advertisement
2/10
तुम्ही कारचे मेंटेनेन्स नियमित केले तर फ्यूल एफिशिएन्सी वाढते. सेफ्टी कायम राहते आणि रीसेल व्हॅल्यूही चांगली मिळते. एक्सपर्ट्नुसार, जे लोक कारची सर्व्हिस आणि चेकअप वेळेवर करतात, त्यांच्या रिपेयर कॉस्ट 50-70% पर्यंत कमी होते. पण थोडीशी जागरुकता आणि सवय तुमची कार नेहमची नव्यासारखी ठेवतात आणि तुमच्या खिशावर अचानक ओझंही पडत नाही. चाल कार चांगल्या स्थितीत ठेवण्याच्या टिप्स जाणून घेऊया.
advertisement
3/10
इंजिन ऑइल आणि फिल्टर नियमितपणे तपासा आणि बदला : इंजिन ऑइल हे कारचा महत्त्वाचा घटक आहे. दर 5,000 ते 10,000 किमी अंतरावर (किंवा कार मॅन्युअलनुसार) तेल आणि ऑइल फिल्टर बदला. जुने किंवा कमी तेल इंजिनची झीज वाढवते, ज्यामुळे इंजिन दुरुस्ती महाग होऊ शकते. उच्च दर्जाचे सिंथेटिक तेल वापरा.
advertisement
4/10
टायरचं प्रेशर आणि रोटेशन योग्यरित्या करा : आठवड्याला टायरचं प्रेशर चेक करा. (मॅन्युअलमध्ये नमूद केलेल्या PSI नुसार). कमी दाबामुळे टायर जलद खराब होतो आणि इंधनाचा वापर वाढतो. एकसमान खराबी सुनिश्चित करण्यासाठी दर 8,000-10,000 किमी अंतरावर टायर फिरवा. तसेच, बॅलन्सिंग आणि व्हील अलाइनमेंट नियमितपणे करा, कारण यामुळे सस्पेंशन आणि स्टीअरिंग घटक खराब होऊ शकतात.
advertisement
5/10
ब्रेक सिस्टम नियमित तपासा : ब्रेक पॅड, डिस्क आणि ब्रेक फ्लुइडची तपासणी प्रत्येक सर्व्हिसमध्ये करा. ब्रेक फ्लुइड प्रत्येक 2 वर्षे किंवा 40 हजार किमीवर बदला. खराब ब्रेकने अॅक्सीटेंडचा धोका वाढतो आणि ब्रेक सिस्टमचा महागडी दुरुस्ती करावी लागते.
advertisement
6/10
कूलेंट, ट्रान्समिशन ऑइल आणि इतर फ्लुइड्स : इंजिन जास्त गरम होऊ नये म्हणून कूलेंट लेव्हल तपासा. ट्रान्समिशन ऑइल (ATF) आणि ब्रेक फ्लुइड वेळेवर बदला. या फ्लुइड्सकडे दुर्लक्ष केल्याने गिअरबॉक्स किंवा इंजिन दुरुस्ती महाग होऊ शकते.
advertisement
7/10
एयर फिल्टर, केबिन फिल्टर आणि फ्यूल फिल्टर : धूळ असलेल्या परिसरामध्ये एयर फिल्टर प्रत्येक 10,000-15,000 किमीवर बदला. खराब एयर फिल्टर इंजिनचीची पॉवर आणि मायलेज कमी करते. केबिन फिल्टरने एसी थंडीची गार हवा चांगली येते आणि अॅलर्जीपासून बचाव होतो.
advertisement
8/10
बॅटरी आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम : बॅटरी टर्मिनल्स स्वच्छ आणि गंजमुक्त ठेवा. दर 4-5 वर्षांनी बॅटरी बदला. लाईट्स, वायपर ब्लेड आणि हॉर्नची नियमितपणे तपासणी करा.
advertisement
9/10
सर्व्हिस शेड्यूल फॉलो करा आणि स्वतः चेक करा : कार मॅन्युअलमध्ये दिलेला सर्व्हिस शेड्यूल फॉलो करा. स्वतः रोज ऑइल लेव्हल, कूलेंट, वायपर फ्लुइड आणि टायर प्रेशर चेक करण्याची सवय करुन घ्या. खराब रस्त्यांवर गाडी हळू चालवा. अचानक ब्रेक आणि एक्सेलरेटर लावू नका.
advertisement
10/10
तुमची गाडी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवा : नियमित वॉशिंग केल्याने गंज लागण्यापासून बचाव होतो. उन्हात पार्किंग टाळा आणि कव्हर वापरा. फक्त उच्च दर्जाचे पार्ट्स वापरा; स्वस्त नकली पार्ट्स टाळा.या टिप्सचे पालन केल्याने, तुम्ही केवळ मोठे खर्च टाळालच पण तुमची गाडी दीर्घकाळ त्रासमुक्त चालेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Car Care Tips: मोठा खर्च टाळायचा असेल तर अवश्य लक्षात ठेवा या गोष्टी! कमी खर्चात होईल काम