Ertiga आता विसरा! 19 किमी मायलेज, फॅमिली आरामात बसेल अशी 7 सीटर SUV, किंमत खूपच कमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
डस्टर लाँच केली आणि त्यानंतर आता भारतातील सगळ्यात स्वस्त अशी ७ सीटर एमपीव्ही लाँच केली आहे.
advertisement
1/10

जपानी वाहन उत्पादक कंपनी निसान मोटर्सने मोठ्या ब्रेकनंतर भारतात कमबॅक केलं आहे. निसानने आधी डस्टर लाँच केली आणि त्यानंतर आता भारतातील सगळ्यात स्वस्त अशी ७ सीटर एमपीव्ही लाँच केली आहे. Nissan Gravite असं या एमपीव्हीचं नाव आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवून निसानने ही ७ सीटर एमपीव्ही तयार केली आहे. सुरुवातीच्या ५००० ग्राहकांसाठी या Nissan Gravite ची किंमत ५.६५ लाख इतकी असणार आहे. पण, निसानने इतकी स्वस्त एमपीव्ही का लाँच केली आणि फिचर्स काय हे जाणून घेऊया.
advertisement
2/10
Nissan Gravite पाहिल्यावर तुम्हाला renault triber ची आठवण येईल. दोन्ही गाड्यांचा बेस हा एकच आहे. फक्त दोन्ही गाड्यांच्या लूकमध्ये बदल करण्यात आला आहे. Nissan Gravite आणि renault triber एकाच बेसवर तयार केल्या असल्या तरी लूक वेगळा आहे.
advertisement
3/10
Nissan Gravite मध्ये DRL डिझाइन, नवीन हनीकॉम्ब ग्रिल, नवीन अलॉय व्हील्स, C-शेप सिल्वर इंसर्ट बंपर आणि बोनटवर ‘GRAVITE’ असं नाव लिहिलं आहे. Nissan Gravite मध्ये Forest Green, Onyx Black, Blade Silver, Snow White आणि Metallic Grey अशा कलरचा पर्याय आहे.
advertisement
4/10
Nissan Gravite ची केबिन सुद्धा Triber सारखीच आहे, पण कलर थीम वेगळी आहे. 5+2 सीटिंग लेआउट दिलं आहे, म्हणजे, पाठीमागे काही सामन ठेवायचं असेल तर दोन सीट फोल्ड करता येतात. डॅशबोर्ड हा साध्याच डिझाईनचा आहे फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग, क्लायमेट कंट्रोल नॉब्स आणि स्टोरेज स्पेस दिले आहेत.
advertisement
5/10
Nissan Gravite मध्ये 8-इंच टचस्क्रीन, 7-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto फिचर्स दिले आहे. तसंच पुश-बटन स्टार्ट, क्रूज कंट्रोल, ऑटोमॅटिक LED हेडलॅंप, रेन-सेंसिंग वायपर, रियर AC वेंट, वायरलेस चार्जिंग, कूल्ड ग्लव्ह बॉक्स आणि रिव्हर्स कॅमेरा सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
6/10
Nissan Gravite मध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स, ABS, पार्किंग सेन्सर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम दिले आहेत. Nissan Gravite मध्ये JBL साउंड सिस्टम, ड्युअल-चॅनेल डॅशकॅम, एम्बिएंट लाइटिंग आणि एअर प्युरिफायर असे फिचर्सही दिले आहे, फक्त ते लाँच केलेल्या मॉडेलमध्ये होते.
advertisement
7/10
Nissan Gravite चं इंजिन फक्त 1.0-लीटर, 3-सिलेंडर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 72hp ची पॉवर आणि 96Nm इतका टॉर्क जनरेट करतो. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT चा पर्याय दिला आहे.
advertisement
8/10
मॅन्युअल व्हेरियंट हे 19.3 किमी इतकाा मायलेज देईल आणि AMT व्हेरियंट हे 19.6 किमी मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. निसानने डीलर-फिट ड्युअल-सिलेंडर CNG किट देण्याचा पर्याय बाकी ठेवला आहे. पण अजून CNG मॉडेल लाँच केलं नाही.
advertisement
9/10
Nissan Gravite ची किंमत ही 5.65 लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप मॉडेलची किंमत ही 8.93 लाख रुपयांपर्यंत आहे.कंपनी या कारसोबत 3 वर्षे आणि 1 लाख किलोमीटर अशी वारंटी दिली आहे.
advertisement
10/10
ही वारंटी ग्राहकाला वाढवता येते, जी 10 वर्षे किंवा 2 लाख किलोमीटरपर्यंत करता येते. Nissan Gravite बूक करणाऱ्या पहिल्या 5,000 ग्राहकांना 5 वर्षांपर्यंत झिरो सर्विस कॉस्ट, फायनान्स आणि अपग्रेड बेनिफिट्स मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Ertiga आता विसरा! 19 किमी मायलेज, फॅमिली आरामात बसेल अशी 7 सीटर SUV, किंमत खूपच कमी!