TRENDING:

'या' आहेत Hyundaiच्या 5 सर्वात स्वस्त कार! 28KM मायलेज, किंमत 5.47 लाख रुपयांपासून सुरू

Last Updated:
Most Affordable Hyundai Cars in India: सर्वसामान्य माणुस कार शोधताना कमी किंमतीत सेफ्टी आणि फीचर्स दोन्हीही शोधत असतो. तुम्हीही याच शोधात असाल तर आज आपण Hyundai च्या 5 कार्सविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/10
'या' आहेत Hyundaiच्या 5 सर्वात स्वस्त कार! 28KM मायलेज, किंमत 5.47 लाख रुपयांपासून सुरू
Hyundai Grand i10 Nios: ह्युंडाईची ही सर्वात परवडणारी आणि स्टायलिश हॅचबॅक आहे. शहरांतील गर्दीच्या रस्त्यांसाठी ही एकदमर परफेक्ट आहे. यामध्ये 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन मिळतं. ही कार चालवण्यात खुप स्मूथ आणि रिफाइंड आहे. या कारच्या केबिनमध्ये प्रीमियम क्वालिटीचा डॅशबोर्ड आणि लेटेस्ट टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिलीये. ज्यामुळे ही बजेट सेगमेंटमध्येही लग्जरी फील देते.
advertisement
2/10
सुरक्षेच्या बाबतीतही ही कार बेस्ट आहे. कारण यामध्ये आता 6 एयरबॅग्स स्टँडर्ड मिळतात. या बजेट कारसाठी ही खुप भारी ठरतं. या कारची सुरुवाती एक्स-शोरुम किंमत 5.47 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारचे पेट्रोल व्हेरिएंट जवळपास 20 किमी/लिटर आणि सीएनजी व्हेरिएंट 27 किमी/किलोग्रामपर्यंत भारी मायलेज देते.
advertisement
3/10
Hyundai Exter: या मायक्रो-एसयूव्हीने बॉक्सी डिझाइन आणि हाय ग्राउंड क्लीयरेन्सने लोकांना वेड लावलेय. यात इलेक्ट्रिक सनरूफ आणि डॅशकॅमसारखे मॉर्डन फीचर्स आहेत. हे फीचर्स महागड्या गाड्यांमध्ये मिळतात. पण तुम्हाला या बजेट कारमध्ये हे फीचर्स मिळतात. म्हणूनच ज्या लोकांना बजेटमध्ये एसयूव्हीचा स्वॅग आणि मजबूती हवीये ते ही गाडी खरेदी करू शकतात.
advertisement
4/10
परफॉर्मेंसही आहे जबरदस्त : या कारचा परफॉर्मेंस विश्वासार्ह आहे. यात 1.2 लिटर इंजिन वापरलं जातं. जे इंजिन मॅन्युअल आणि एएमटी दोन्ही गियरबॉक्ससह येतं. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.64 लाख रुपयांपासून सुरू होते. पेट्रोलवर ही कार 19.4 किमी/लिटर आणि ड्यूअल-सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजीसह 27.1 किमी/किलोग्रामचा अॅव्हरेज देते.
advertisement
5/10
Hyundai Aura: तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी मोठा बूट स्पेस असणारी सेडान शोधत असाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. या कारचा प्रीमियम लूक आणि क्रोम गिलमुळे ती रोडवर उठून दिसते. टॅक्सी आणि पर्सनल वापर दोन्हीसाठीही बेस्ट आहे. कारण यात आरामदायक सीट आहेत. एवढंच नाही तर मेंटेनेंसही कमी लागतं.
advertisement
6/10
ऑराच्या आतील रियर एसी व्हेंट्स आणि वायरलेस चार्जिंगसारख्या फीचर्समुळे या कारमध्ये प्रवास आरामदायक होतो. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 5.98 लाख रुपये आहे. मायलेजविषयी बोलायचं झाल्यास, ही कार खुपच परवडणारी आहे. यात पेट्रोल व्हेरिएंट 20 किमी/लिटर आणि सीएनजी व्हेरिएंट जवळपास 28 किमी/किलोग्रामचं मायलेज सहज देते.
advertisement
7/10
Hyundai i20: ही प्रीमियम हॅचबॅक आपल्या शार्प सेन्सुअस स्पोर्टीनेस डिझाइनसाठी ओळखली जाते. यात मोठी कनेक्टेड स्क्रीन, बोस साउंड सिस्टम आणि सनरूफ सारखे हाय-एंड फीचर्स मिळतात. ज्या तरुणांना स्टाइलसह ड्रायव्हिंगचा जबरदस्त अनुभव हवाय आणि प्रीमिमय इंटीरियर हवं आहे त्यांना ही गाडी आकर्षित करते.
advertisement
8/10
सेफ्टीसाठी यात इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलसह हिल असिस्ट सारखे फीचर्स देण्यात आलेय. या कारची एक्स-शोरुम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये ही कार जवळपास 19 किमी/लिटर आणि आयव्हीटी ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये जवळपास 17-18 किमी/लिटरचं क्लेम्ड मायलेज देते.
advertisement
9/10
Hyundai Venue: ही कारही बेस्ट आहे. कारण ती दमदार रोड प्रेझेंस आणि हाय-टेक फीचर्ससाठी खुप प्रसिद्ध आहे. यात मल्टीपल इंजिन ऑप्शन मिळतात. ज्यात पॉवरफूल टर्बो पेट्रोल इंजिनचाही समावेश आहे. या कारचे केबिन खुप व्हेंटिलेटेड आहे. यात ड्रायव्हरसाठी अनेक प्रकारचे कनेक्टेड कार फीचर्स दिलेय.
advertisement
10/10
ही कार शहर आणि हायवे दोन्हीसाठी बेस्ट आहे. दोन्ही ठिकाणी कारचा परफॉर्मेंस हा जबरदस्त असतो. या कारची एक्स-शोरुम किंमत 7.99 लाखांपासून सुरू होते. मायलेजच्या बाबतीत याचं 1.2 लिटर पेट्रोल इंजिन 17.5 किमी/लिटर आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल व्हेरिएंट जवळपास 18.2 किमी/लिटरपर्यंत मायलेज देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
'या' आहेत Hyundaiच्या 5 सर्वात स्वस्त कार! 28KM मायलेज, किंमत 5.47 लाख रुपयांपासून सुरू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल