TRENDING:

Astrology 2026: वाढीव बँक बॅलन्समुळे सुखद धक्का! एप्रिलच्या सुरुवातीला 3 राशींना आनंदी-आनंद; लकी केंद्रदृष्टी योग

Last Updated:
April Horoscope 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन महत्त्वाचे मानले जातेच त्यासोबत ग्रहांची काही विशिष्ट स्थितीही मारक किंवा लाभदायी ठरत असते. ज्योतिषीय गणनेनुसार दोन ग्रह एकमेकांशी 90 अंशाच्या कोनात असतात, तेव्हा केंद्रदृष्टी योग तयार होतो. असं घडून येण्याला अत्यंत शुभ स्थिती मानली जाते.
advertisement
1/6
वाढीव बँक बॅलन्समुळे सुखद धक्का! एप्रिलच्या सुरुवातीला 3 राशींना आनंदी-आनंद; लकी केंद्रदृष्टी योग
केंद्रदृष्टी योग तयार झाल्यानं काही राशींना विशेष लाभ होणार आहे. या योगात राशींना करिअरमध्ये प्रगती, आर्थिक प्रगती आणि भाग्य चकण्याचे योग आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार गुरु, सूर्य, शुक्र किंवा शनी यांच्या संयोगाने हा योग तयार होतो तेव्हा तो खूपच फळदायी ठरतो.
advertisement
2/6
येत्या नवीन महिन्यात दिनांक 06 एप्रिल रोजी सूर्य आणि गुरू यांचा हा योग तयार होईल. या दिवशी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 90 अंशाच्या कोनात असतील. या शुभ स्थितीचा काही राशींना जबरदस्त फायदा होईल, त्याविषयी जाणून घेऊ.
advertisement
3/6
मिथुन - केंद्रदृष्टी योग मिथुन राशीसाठी अत्यंत शुभ ठरेल. या राशीच्या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. एखाद्या प्रयत्नात अनपेक्षित मोठे यश मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात करिअरमध्ये मोठे यश मिळेल. भागीदारीच्या व्यवसायातून मोठा नफा मिळेल. नवीन नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायातही भरभराट होईल. लव्ह लाईफमध्येही काहीतरी विशेष घडू शकते.
advertisement
4/6
कन्या - सूर्य आणि गुरु यांची ही शुभ युती कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत चांगले परिणाम घेऊन येईल. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात लक्षणीय लाभ अपेक्षित आहे. तुम्ही गुंतवणुकीद्वारे चांगले पैसे कमवण्यातही यशस्वी व्हाल.
advertisement
5/6
विशेष म्हणजे कन्या राशीचे काही लोक दीर्घकालीन आजारातून मुक्त होतील. तुमच्या कुटुंबात शुभ घटना घडतील. परदेशात नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुमची आर्थिक परिस्थिती खूप भक्कम राहील.
advertisement
6/6
धनु - हा योग धनु राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे फायदे मिळवून देईल. केलेल्या आणि आशा लावून ठेवलेल्या कामांना अपेक्षित परिणाम मिळतील. तुमच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करण्याची योजना करू शकता. घरातील वातावरण फार चांगलं राहील. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology 2026: वाढीव बँक बॅलन्समुळे सुखद धक्का! एप्रिलच्या सुरुवातीला 3 राशींना आनंदी-आनंद; लकी केंद्रदृष्टी योग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल