पार्थ-काव्याची Good News! प्रेक्षकांनी घेतली खूपच सीरियसली, 24 तासात घडलं असं काही की...
- Published by:Minal Gurav
Last Updated:
लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. काव्या आणि पार्थ आई बाबा होणार आहेत. मालिकेचा प्रोमो समोर येताच प्रेक्षकांना तो आवडला आहे.
advertisement
1/8

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' प्रेक्षकांच्या मनात दिवसेंदिवस अधिक घट्ट स्थान निर्माण करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आणि त्यांची भावनिक गोष्ट प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे.
advertisement
2/8
लवकरच मालिकेत एक अत्यंत खास आणि भावनिक टप्पा येणार आहे. पार्थ आणि काव्या लवकरच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी समोर येणार आहे.
advertisement
3/8
प्रत्येक नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा आणि सुंदर प्रवास असतो, आणि मालिकेतही याच प्रवासाची सुरुवात होणार आहे.
advertisement
4/8
तर जिवा आणि नंदिनीच्या आयुष्यात वादळ आलं आहे. नंदिनीचं आई होणं कठीण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
5/8
दोन बहिणींच्या आयुष्यात एकाच वेळी सुख-दुःखाची भरती येणार आहे. काव्या आणि पार्थची ही गुड न्यूज आणि मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांनी खूपच सीरियसली घेतली. 24 तासात या भागाच्या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
advertisement
6/8
या नव्या वळणाचा प्रोमो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. अवघ्या 24 तासांत या प्रोमोने 5 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवत एक नवा विक्रम रचला आहे.
advertisement
7/8
सोशल मीडियावरही या प्रोमोला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पार्थ-काव्याच्या या नव्या प्रवासासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.
advertisement
8/8
प्रेक्षकांकडून मिळणारं भरभरून प्रेम हे प्रत्येक कलाकारासाठी खूप खास असतं. या प्रतिसादामुळे 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेची संपूर्ण टीम आनंद व्यक्त करत असून, मालिकेत येणारं हे नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पार्थ-काव्याची Good News! प्रेक्षकांनी घेतली खूपच सीरियसली, 24 तासात घडलं असं काही की...