TRENDING:

Lip Care : काळवंडलेले आणि कोरडे झालेले ओठ दिसतील गुलाबी, घरगुती उपाय ठरतील परिणामकारक, ओठ होतील मुलायम

Last Updated:

काळवंडणाऱ्या ओठांसाठी घरगुती उपाय अधिक परिणामकारक आहेत आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा आहे. काळ्या पडलेल्या ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी व्हावेत यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्यात जाणवणारी एक प्रमुख समस्या म्हणजे डिहायड्रेशन. याचे  परिणाम शरीरावर होत असतात. डिहायड्रेशनमुळे ओठ काळे पडू शकतात.
News18
News18
advertisement

डिहायड्रेशन म्हणजे निर्जलीकरण, जीवनशैलीतले बदल, कॅफीनचं अतिसेवन, धूम्रपान, तीव्र सूर्यप्रकाश आणि रासायनिक लिपस्टिक या कारणांमुळे ओठ काळे पडू शकतात.

काळवंडणाऱ्या ओठांसाठी घरगुती उपाय अधिक परिणामकारक आहेत आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा आहे. काळ्या पडलेल्या ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी व्हावेत यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया.

मध आणि लिंबू - मधामुळे ओठांना ओलावा मिळतो आणि ओठ यामुळे हायड्रेटेड राहतात, तर लिंबामधील नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म ओठांचा काळपटपणा कमी करतात. एक चमचा मधात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि ते तुमच्या ओठांवर लावा. दहा-पंधरा मिनिटांनंतर ते धुवून टाका.

advertisement

Skin Care : ऐन उन्हाळ्यातही त्वचा दिसेल मुलायम, कोरड्या त्वचेच्या समस्येवर नैसर्गिक उपायांची यादी

गुलाबाच्या पाकळ्या - गुलाबाच्या पाकळ्यांमुळे ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग मिळतो. यासाठी, गुलाबाच्या पाकळ्या थोडा वेळ दुधात भिजवून त्याची पेस्ट बनवा आणि ती तुमच्या ओठांवर लावा. पंधरा मिनिटं तशीच राहू द्या आणि नंतर धुवून टाका.

साखर आणि ऑलिव्ह ऑइल स्क्रब - मृत त्वचेमुळे ओठ अनेकदा निस्तेज आणि काळे दिसू शकतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी, अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइलमधे एक चमचा साखर मिसळून स्क्रब तयार करा. हे मिश्रण दोन ते तीन मिनिटं तुमच्या ओठांवर हळुवारपणे मसाज करा आणि नंतर धुवून टाका.

advertisement

Stomach Problem : उन्हाळ्यात वाढतो पोटफुगीचा त्रास, थोडंसं खाल्ल्यावरही पोट फुगत असेल तर हा उपाय वापरुन पाहा

बीटाचा रस - बीटामधील नैसर्गिक लाल रंगद्रव्यामुळे ओठ उजळतात. झोपण्यापूर्वी ओठांवर बीटाचा रस लावा आणि रात्रभर तसाच राहू द्या. सकाळी धुवा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
छंद असावा तर असा, तब्बल 10 हजार दुर्मिळ टपाल तिकिटाचा केला संग्रह, काय आहे खास? Video
सर्व पहा

हळद आणि दूध - हळदीत त्वचा उजळ करण्याचे गुणधर्म आहेत, तर दुधामुळे ओठांचं पोषण होतं. चिमूटभर हळद थोड्या दुधात मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण ओठांवर पाच मिनिटं लावून हलक्या हातानं मसाज करा. त्यानंतर, स्वच्छ धुवा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Lip Care : काळवंडलेले आणि कोरडे झालेले ओठ दिसतील गुलाबी, घरगुती उपाय ठरतील परिणामकारक, ओठ होतील मुलायम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल