3 महिन्यांपूर्वी सोडली हिट मालिका, 15 दिवसांआधी आई झाली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला बाळाचा PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं नुकतीच गुड न्यूज शेअर केली. अभिनेत्रीनं बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे.
advertisement
1/9

मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकार लग्न करत आहेत. एकीकडे कलाकारांच्या लग्नाची सनई चौघडे वाजत असताना दुसरीकडे मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्री आई झाली असून तिनं ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
advertisement
2/9
ही अभिनेत्री झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत काम करत होती. मालिका TRP मध्ये हिट होत असताना अभिनेत्री अचानक मालिकेतून गायब झाली. अभिनेत्रीचं पात्रच मालिकेत आता दिसत नाही.
advertisement
3/9
या प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 महिन्यांआधी मालिका सोडली आणि आता ती आई झाल्याची बातमी समोर आली आहे. 15 दिवसांआधीच ती आई झाली असून तिनं उशिरा ही बातमी शेअर केली.
advertisement
4/9
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे सई कल्याणकर. कमळी मालिकेत ऋषीच्या वहिनीची भूमिका साकारणारी सई कल्याणकर 15 दिवसांआधीच आई झाली.
advertisement
5/9
अभिनेत्री सई कल्याणकर हिनं मुलीला जन्म दिला. लग्नाच्या 4 वर्षांनी सई आई झाली. सईच्या घरी लक्ष्मी आली. सई आणि तिचं कुटुंब लेकीच्या जन्मानंतर खूप खुश आहे.
advertisement
6/9
"प्रेम करण्यासाठी, उजळण्यासाठी जन्मलेली आमची लिटिल एंजेल आली आहे", असं म्हणत सईनं बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये बाळानं तिच्या चिमुकल्या हातामध्ये सईचा हात धरलेला दिसत आहे.
advertisement
7/9
10 मार्च 2026 रोजी सईला मुलगी झाली. तिनं जवळपास 15 दिवसांनी ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. आनंदाची बातमी शेअर करताच चाहत्यांनी सई आणि तिच्या बाळावर आशीर्वाद आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.
advertisement
8/9
अभिनेत्री सई कल्याणकर हिनं प्रेग्नंसीमध्ये कमळी या मालिकेचं शूटिंग केलं होतं. संपूर्ण मालिकेत कधीच ती प्रेग्नंट असल्याचं दिसलं नाही. परंतु सातव्या महिन्यानंतर सईने कमळी मालिकेतून ब्रेक घेतला. त्यानंतर मालिकेतील ऋषीच्या वहिनीच्या जागी अद्याप कोणतीही नवी अभिनेत्री दिसलेली नाही.
advertisement
9/9
सई आता आई झाल्यानंतर पुन्हा एकदा कमळी मालिकेत कमबॅक करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान सईने याबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही. पण तिला पुन्हा कमळी मालिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते आतूर आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
3 महिन्यांपूर्वी सोडली हिट मालिका, 15 दिवसांआधी आई झाली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला बाळाचा PHOTO