TRENDING:

‘बाबा, मला वाचवा,’ व्हॉट्सअपचा कॉल, लेकाला वाचवण्यासाठी ‘तो’ निर्णय, पण सूनेच्या मेसजनं धक्कादायक कांड समोर

Last Updated:

Mumbai News: सुशीलकुमार यांनी पैसे पाठवल्यानंतर काही वेळात ही घटना सुनेला सांगितली. तिने अंकित याला मेसेज केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. पैसे उकळण्यासाठी गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर केला जातोय. आता मुंबईतल्या मालाड परिसरातून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मुलाच्या अटकेचा बनाव करून एका व्यक्तीकडून 1.75 लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘बाबा, मला वाचवा,’ व्हॉट्सअपचा कॉल, लेकाला वाचवण्यासाठी ‘तो’ निर्णय, पण सूनेच्या मेसजनं धक्कादायक कांड समोर
‘बाबा, मला वाचवा,’ व्हॉट्सअपचा कॉल, लेकाला वाचवण्यासाठी ‘तो’ निर्णय, पण सूनेच्या मेसजनं धक्कादायक कांड समोर
advertisement

नेमकं घडलं काय?

सुशीलकुमार कुलश्रेष्ठ (वय 67) हे पत्नी अंजना (वय 66) आणि 39 वर्षीय मुलगा अंकितसह मालाड पश्चिमच्या शंकरलेन परिसरात राहतात. तक्रारीनुसार, मंगळवारी सकाळी सुशीलकुमार यांच्या मोबाइलवर एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल आला होता. तेव्हा त्याने स्वत:ला पोलीस असल्याचे सांगितले. तसेच ‘तुमचा मुलगा अंकित याला एका गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याने तुमचे नाव सांगितले आहे. जर तुम्ही तत्काळ दोन लाख रुपये पाठवले, तर त्याला सोडून देऊ,’ असं सांगितलं.

advertisement

अजबच! महाराष्ट्रात इथं आहे ‘नवरा-नवरी’चं मंदिर, नवसासाठी होते गर्दी, पण 'ते' गूढ आजही कायम, Video

पुन्हा धमकीचा फोन

अचानक आलेल्या फोनमुळे सुशीलकुमार घाबरलेले होते. त्यातच मुलाचा फोन जप्त केला असून त्याला कुणीही संपर्क साधू नये, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे त्यांनी ही बाब पत्नीला सांगितली. तसेच तीन बँक खात्यातून प्रत्येकी 50 हजार रुपये असे एकूण 1 लाख 50 हजार रुपये काढले. तसेच घरातील 25 हजार रुपये असे 1 लाख 75 हजार रुपये जमवले आणि संबंधित भामट्याने सांगितलेल्या खात्यांवर पाठवले. त्यानुसार संजयकुमार शर्मा याच्या नावावर 1.25 लाख तर समीर मंडलच्या नावावर 50 हजार वर्ग झाले.

advertisement

मुलगा सुरक्षितच...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अजबच! महाराष्ट्रात इथं आहे ‘नवरा-नवरी’चं मंदिर, नवसासाठी होते गर्दी, पण 'ते' गूढ आजही कायम, Video
सर्व पहा

सुशीलकुमार यांनी पैसे पाठवल्यानंतर काही वेळात ही घटना सुनेला सांगितली. तिने अंकित याला मेसेज केला. त्याने परत फोन करून तो सुरक्षित असून ऑफिसमध्येच असल्याचे सांगितले. तसेच त्याला अटक झालेली नसल्याचे कळवले. यानंतर मात्र कुटुंबीयांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी थेट मालाड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
‘बाबा, मला वाचवा,’ व्हॉट्सअपचा कॉल, लेकाला वाचवण्यासाठी ‘तो’ निर्णय, पण सूनेच्या मेसजनं धक्कादायक कांड समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल