एप्रिल-मेच्या कडक उन्हात किती नंबरवर चालवावं फ्रीज? कोणीच सांगणार नाही ही ट्रिक
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Fridge Using Tips: उन्हाळ्यात फ्रिज किती टेम्परेचरवर चालवावं याविषयी अनेक लोकांना माहितीच नसते. आता एप्रिल सुरू होणार आहे. एप्रिल-मेमध्ये कडक उन्हाळा असतो. पाहूया फ्रिजचं टेम्परेचर किती ठेवावं.
advertisement
1/7

उन्हाळा सुरू झालाय, या काळात लोकांना खुप तहान लागते. मग काय अनेक जणांना तर फ्रिजमधलं पाणी लागतं. म्हणूनच फ्रिजची प्रचंड गरज असते. यासोबतच उन्हाळ्यात बाहेर जेवण, अन्न पदार्थ लवकर खराब होतात. यामुळे ते फ्रिजमध्ये ठेवावे लागतात. म्हणूनच आज आपण उन्हाळ्यात फ्रिज वापरण्याच्या काही ट्रिक्स पाहूया...
advertisement
2/7
फ्रिज वापर टिप्स : सध्याच्या काळात स्मार्ट फ्रिजमध्ये अनेक अडव्हान्स फीचर्स येतात. पण ज्या घरांमध्ये जुना फ्रिज आहे. त्यात टेम्परेचर अॅडजस्ट करू शकता. अशावेळी एप्रिल-मेच्या कडक उन्हात तुम्ही फ्रिजचं टेम्परेचर किती ठेवायचं हवं? याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया.
advertisement
3/7
फ्रिज कूलिंग टिप्स : एप्रिल-मेमध्ये प्रचंड ऊन असतं. घराबाहेर पडणंही कठीण होतं. अशावेळी घरातील फ्रिज खुप गरेचा असतो. पण याचा वापर करताना फ्रिज योग्य टेम्परेचरवर सेट करणं गरजेचं आहे. जेणेकरुन त्यातील अन्न-पदार्थ हे सुरक्षित आणि गार राहतील. यासोबतच वीज बिलही कंट्रोलमध्ये राहील.
advertisement
4/7
उन्हाळ्यात एवढं ठेवा फ्रिजचं तापमान : अनेक फ्रिजमध्ये टेम्परेचर सेटिंग डायल असतं. ज्यात मॅन्युअली तापमान अॅडजस्ट केलं जाऊ शकतं. एप्रिल-मेच्या उष्णतेमध्ये फ्रिजचं तापमान 3 डिग्री ते 5 डिग्री दरम्यान ठेवायला हवं. यामुळे दूध, फळ-भाज्या, जेवण दीर्घकाळ ताजं राहू शकतं. तुम्ही जास्त टेम्परेचर केल्यास फ्रिजमधील फळं-भाज्यांचा बर्फ होऊ शकतो.
advertisement
5/7
या गोष्टी ठेवा लक्षात : यासोबतच फ्रिजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नका. यामुळे फ्रिज उशीरा कूलिंग करते. यासोबतच फ्रिजच्या दरवाज्याचं रबर खराब झालं असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. याचा कूलिंगवर परिणाम होतो. वीजही जास्त लागू शकते.
advertisement
6/7
फ्रिजच्या दाराची रबर चेंज करा : फ्रिजच्या दरवाच्याचं रबर खराब झाल्याने कूलिंग करण्यात अडचणी येऊ शकतात. यासोबतच वीज बिलही जास्त लागते. अशावेळी ते कुठून तुटले असेल तर लगेच चेंज करुन घ्या.
advertisement
7/7
फ्रिज आणि भिंतीतील अंतर : अनेक घरांमध्ये फ्रिज हे भिंतीला चिटकवून ठेवलं जातं. पण उन्हाळ्यात असं करणं महागात पडू शकते. कारण बाहेर आधीच उष्णता असते. अशावेळी फ्रिज जास्त तापतं. यामुळे ते भिंतीला चिटकवून ठेवलं असेल तर मागच्या बाजूने ते जास्त तापेल. म्हणून ते भिंतीपासून दूर ठेवा. ज्यामुळे हवा खेळती राहील आणि फ्रिज जास्त गरम होणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
एप्रिल-मेच्या कडक उन्हात किती नंबरवर चालवावं फ्रीज? कोणीच सांगणार नाही ही ट्रिक