TRENDING:

Ashok Kharat : अशोक खरातचा कथित मॅनेजर रमेश हिंगे मीडियासमोर, "रविवारी मंदिरात जायचो, तिथं...'', केला मोठा दावा

Last Updated:

Ashok Kharat PA : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील कथित पीए रमेश हिंगे फरार झाल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले रमेश हिंगे आज स्वतः प्रसारमाध्यमांसमोर आले .

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील कथित पीए रमेश हिंगे फरार झाल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले रमेश हिंगे आज स्वतः प्रसारमाध्यमांसमोर आले असून, त्यांनी खरातशी असलेल्या संबंधांबाबत मोठे स्पष्टीकरण दिले आहे. "माझा आणि अशोक खरातचा कोणताही व्यावसायिक संबंध नाही, मी त्याचा पीए किंवा मॅनेजर नाही," असा दावा हिंगे यांनी केला आहे.
अशोक खरातचा कथित मॅनेजर रमेश हिंगे मीडियासमोर, "रविवारी मंदिरात जायचो, तिथं...'', केला मोठा दावा
अशोक खरातचा कथित मॅनेजर रमेश हिंगे मीडियासमोर, "रविवारी मंदिरात जायचो, तिथं...'', केला मोठा दावा
advertisement

"मी केवळ रविवारी मंदिरात जायचो, तिथं.."

रमेश हिंगे यांनी सांगितले की, ते पेशाने शिक्षक आहेत. "रविवारी जेव्हा मला शाळेला सुट्टी असायची, तेव्हा मी श्रद्धेपोटी मंदिरात 'स्वयंसेवक' म्हणून जात होतो. त्या पलीकडे माझा खरातच्या कोणत्याही अघोरी कृत्यांशी किंवा व्यवहारांशी संबंध नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. गुन्हा दाखल झाल्यापासून हिंगे फरार असल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली होती, मात्र आज त्यांनी समोर येऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

advertisement

तपासात सहकार्य करणार?

खरातच्या 'ओकस प्रॉपर्टीज' आणि इतर व्यवहारांत हिंगे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, हिंगे यांनी स्वतःहून समोर येत आपली बाजू मांडल्याने आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलीस आता हिंगे यांच्या या दाव्याची शहानिशा करणार असून, खरातच्या काळ्या साम्राज्यात त्यांचा खरोखरच सहभाग होता की ते केवळ एक भक्त होते, हे तपासाअंती स्पष्ट होईल.

advertisement

खरातची मालमत्ता तपास यंत्रणांच्या रडारवर...

नाशिकमधील वादग्रस्त 'भोंदू' अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा तपास आता त्याच्या अफाट संपत्तीकडे वळला आहे. अवघ्या १०-१२ वर्षांत खरातने तब्बल १५०० कोटी रुपयांची माया जमवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नाशिक सायबर विभागाने आता 'नॅटग्रीड' (NATGRID) या शक्तिशाली ॲप्लिकेशनच्या साहाय्याने खरातच्या बँक खात्यांचे धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् ‘तो’ मालक बनला, 5 वर्षांत मच्छीचा फेमस ब्रँड, यशाचं रहस्य काय? Video
सर्व पहा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने हे १५०० कोटींचे साम्राज्य एकट्याने उभे केलेले नाही. यात अनेक बडे सरकारी अधिकारी आणि बड्या राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याची दाट शक्यता आहे. या 'बड्या' मंडळींच्या मदतीनेच खरातने अल्पावधीत इतकी मोठी मालमत्ता जमवली. पोलीस आता या 'बॅकएंड' सपोर्टरचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat : अशोक खरातचा कथित मॅनेजर रमेश हिंगे मीडियासमोर, "रविवारी मंदिरात जायचो, तिथं...'', केला मोठा दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल