TRENDING:

Maruti Fronx किती पगार असलेल्या लोकांनी खरेदी करावी? पाहा कॅलक्युलेशन

Last Updated:
Maruti Fronx पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही फ्यूल ऑफ्शनमध्ये खरेदी केली जाऊ शकते. यामध्ये दोन इंजिन पर्याय मिळतात. पहिला 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे तर दुसरा 1.2 लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे.
advertisement
1/6
Maruti Fronx किती पगार असलेल्या लोकांनी खरेदी करावी? पाहा कॅलक्युलेशन
मारुती फ्रॉन्क्स भारतीय बाजारात खुप पसंत केली जाते. कंपनीने गेल्या वर्षीच गाडीला स्टँडर्ड 6 एयरबॅगसह अपडेट केले होते. तुम्ही ही गाडी खरेदी करु इच्छित असाल तर तुम्ही फूल पेमेंट देऊन खरेदी करणे गरजेचे नाही. तुम्ही याला फायनेन्सही करु शकतात. चला या गाडीच्या ऑन रोड किंमत आणि ईएमआयच्या गणिताविषयी सविस्तर जाणून घेऊया. सोबत किती पगार असलेले लोक ही कार खरेदी करु शकतात हे देखील जाणून घेऊया.
advertisement
2/6
गाडीची किंमत आणि EMI किती? : दिल्लीमध्ये याच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत 6.84 लाख रुपये आहे. यामध्ये जवळपास 47,943 रुपयांचं आरटीओ चार्ज आणि 37,961 रुपयांचंय अंदाजे इन्शुरन्स जोडल्यानंतर त्याची ऑन-रोड किंमत जवळपास 7.77 लाख रुपये होते. खरंतर या किंमती शहर आणि डीलरशिपनुसार कमी-जास्त होऊ शकतात.
advertisement
3/6
तुम्ही 1 लाख रुपये डाउन पेमेंट केली तर तुम्हाला 6.76 लाख रुपयांचा कार लोन घ्यावं लागेल. 9.8% वर्ष व्याजदरावर पाच वर्षांसाठी हे लोन घेतल्यास तुम्हाला दरमहिन्याचा EMI जवळपास 14,317 रुपये येईल.
advertisement
4/6
किती सॅलरीवर खरेदी करावी कार? : आता आपण सॅलरीविषयी बोलूया. ज्यामुळे तुम्हाला ईएमआय मॅनेज करण्यात मदत होईल. तुमचं मासिक उत्पन्न 40 हजार रुपये ते 50 हजार रुपयांच्या दरम्यान असेल आणि तुमच्यावर इतर मोठं लोन नाही. तर तुम्ही या एसयूव्हीचा EMI आरामात भरु शकता.
advertisement
5/6
जास्तीत जास्त बँक आणि फायनेन्स कंपन्या मानतात की, तुमच्या सॅलरीच्या 30-40% पर्यंत ईएमायच्या वापरासाठी केला जाऊ शकतो. म्हणजेच 45,000 रुपयांच्या सॅलरीवर 13,500 ते 18,000 रुपयांपर्यंत ईएमआय मॅनजे करणे शक्य आहे.
advertisement
6/6
Maruti Fronx पेट्रोल आणि CNG इंधन दोन्ही ऑप्शनमध्ये खरेदी करता येते. हे दोन इंजिन ऑप्शनसह उपलब्ध आहे: 1.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन जे 99 बीएचपी आणि 147.6 एनएम टॉर्क निर्माण करते. 1.2-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 89 बीएचपी आणि 113 एनएम टॉर्क निर्माण करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Maruti Fronx किती पगार असलेल्या लोकांनी खरेदी करावी? पाहा कॅलक्युलेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल