किती दिवस फॅमिलीला उन्हात फिरायला नेणार? घरी आणा 20 किमी मायलेज अन् 5.65 लाखांची 7 सीटर MPV
- Published by:Sachin S
Last Updated:
फॅमिली मोठी असते अन् बजेटही नसल्यामुळे मोठी कार घेण्याचं स्वप्न हे स्वप्नचं राहुन जातं. पण, आता स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. कारण, बाजारात अशा २ गाड्या आहे, ज्यामध्ये ७ जण आरामात बसतील आणि कारच्या किंमतीत गाडी दारातही उभी राहिल.
advertisement
1/10

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, सगळ्यांना गारेगार प्रवासाची आठवण होते, पण हा प्रवास काही दुचाकी किंवा सरकारी बसमध्ये अनुभवता येणार नाही. त्यासाठी स्वत:च्या मालकीची एखादी छोटी का असेना कार दारात हवी असते. पण, फॅमिली मोठी असते अन् बजेटही नसल्यामुळे मोठी कार घेण्याचं स्वप्न हे स्वप्नचं राहुन जातं. पण, आता स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. कारण, बाजारात अशा २ गाड्या आहे, ज्यामध्ये ७ जण आरामात बसतील आणि कारच्या किंमतीत गाडी दारातही उभी राहिल.
advertisement
2/10
यामध्ये पहिली ७ सीटर एमपीव्ही येते ती म्हणजे Renault मोटर्सची Triber. Renault Triber ही भारतातील सगळ्यात स्वस्त आणि मस्त अशी ७ सीटर एमपीव्ही आहे. या एमपीव्हीमध्ये मॉड्युलर सीटिंग अरेजमेंट दिली असल्यामुळे सीट फोल्ड करून ५ सीटर किंवा ७ सीटर सुद्धा करता येते.
advertisement
3/10
Renault Triber मध्ये इंजिन हे ९९९ सीसी क्षमतेचं ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे ७१ bhp पॉवर आणि ९६ Nm टॉर्क जनरेट करतो. या Renault Triber मध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असा पर्याय सुद्धा दिला आहे.
advertisement
4/10
Renault Triber मध्ये फिचर्सची काही कमी नाही. एखाद्या प्रिमियम ७ सीटर एसयूव्हीसारखेच फिचर्स दिले आहे. ८-इंच टचस्क्रीन, ६ एअरबॅग्ज, सीट मागे पुढे करता येतील किंवा तिसरी रो कमी सुद्धा करता येईल. विशेष म्हणजे, या गाडीचं १८२ एमएम ग्राउंड क्लीयरन्स दिला आहे.
advertisement
5/10
Renault Triber च्या मायलेजबद्दल बोलायचं झालं तर ही गाडी जवळपास १८ ते २० किमी प्रति लिटर इतकं मायलेज देते. ७ सीटर असून सुद्धा एर्टिगापेक्षा जास्त मायलेज देते.
advertisement
6/10
Renault Triber च्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर या गाडीचं बेस मॉडेल हे ५.९९ लाख रुपयांपासून सुरू होतं. या गाडीचं टॉप मॉडेल हे ८.९७ लाखांपर्यंत आहे.
advertisement
7/10
जर तुम्हाला Renault Triber चं डिझाईन आवडलं नाहीतर तर या गाडीसारखीच सेम कार्बन कॉपी निसान मोटर्सने अलीकडेच लाँच केली आहे. Nissan Gravite असं या ७ सीटर एमपीव्हीचं नाव आहे. Nissan Gravite ही Renault Triber च्या बेसवर तयाार केली आहे. फक्त बाहेरील लूक आणि काही फिचर्समध्ये बदल केले आहे.
advertisement
8/10
Nissan Gravite मध्ये १००० सीसीचं ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे ७२ PS पॉवर आणि ९६ एन एम टॉर्क जनरेट करेल.
advertisement
9/10
Nissan Gravite मध्ये निसानची सिग्नेचर ग्रिल आणि नवीन LED हेडलॅम्प्स दिले आहे. आतमध्ये JBL साउंड सिस्टम आणि डॅशकॅम (Dashcam) सारखे फिचर्स दिले आहे. सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्ज आणि ईएससी ESC सारखे ३०+ पेक्षा जास्त सेफ्टी फिचर्स दिले आहे.
advertisement
10/10
Nissan Gravite च्या मायलेजबद्दल बोलायचं झालं तर ही गाडी जवळपास १९.३ ते १९.६ किमी इतकं मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. या Nissan Gravite ची सुरुवाती किंमत ५.६५ लाखांपासून सुरू होते. टॉप मॉडेल हे ८.९४ लाखांपर्यंत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
किती दिवस फॅमिलीला उन्हात फिरायला नेणार? घरी आणा 20 किमी मायलेज अन् 5.65 लाखांची 7 सीटर MPV