TRENDING:

कॉलेजला जाण्यासाठी Royal Enfield ची कोणती बाइक बेस्ट? घ्या जाणून किंमतीसह फीचर्स

Last Updated:
Royal Enfield Hunter 350: नवीन हंटर 350 मध्ये 13 लिटरची फ्यूल टँक आहे. जो लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम आहे. ही बाईक तुमच्यासाठी दररोज कॉलेज अप-डाऊनसाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते.
advertisement
1/6
कॉलेजला जाण्यासाठी Royal Enfield ची कोणती बाइक बेस्ट? घ्या जाणून किंमतीसह फीचर्स
Royal Enfield Hunter 350: तुम्ही दररोज कॉलेज अप-डाऊनसाठी बाईक शोधत असाल, जी स्टायलिश तसेच कमी बजेटमध्ये येते, तर रॉयल एनफील्ड हंटर 350 तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते. हंटर 350 चे नवीन मॉडेल गेल्या महिन्यात लाँच करण्यात आले.
advertisement
2/6
नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये 349cc सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 20.2bhpपॉवर आणि 27Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईक 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे, जी उत्तम रायडिंग अनुभव देते.
advertisement
3/6
नवीन हंटरमध्ये 13-लिटर इंधन टाकी आहे : नवीन हंटर 350 मध्ये 13-लिटर इंधन टाकी आहे, जी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम आहे. सस्पेंशनबद्दल बोलायचे झाले तर, समोर 41 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस 6-स्टेप अॅडजस्टेबल प्रीलोडसह ट्विन शॉक अ‍ॅब्झॉर्बर आहेत.
advertisement
4/6
मोटरसायकलचा ग्राउंड क्लीयरन्स 160 मिमी, व्हीलबेस 1,370 मिमी आणि वजन 181 किलो आहे. या सर्व फीचर्ससह ही बाईक मजबूत आणि स्थिर बनते.
advertisement
5/6
रॉयल एनफील्ड 350 ची फीचर्स : रॉयल एनफील्डने नवीन हंटर 350 मध्ये अनेक उत्तम फीचर्स समाविष्ट केली आहेत. यामध्ये तुम्हाला ड्युअल-चॅनेल एबीएस, 300mm फ्रंट डिस्क ब्रेक (ट्विन-पिस्टन फ्लोटिंग कॅलिपरसह) आणि 270mm रियर डिस्क ब्रेक (सिंगल-पिस्टन फ्लोटिंग कॅलिपरसह) मिळतील. याशिवाय, बाइकमध्ये डिजी-अ‍ॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टाइप-सी यूएसबी फास्ट चार्जर सारखी आधुनिक वैशिष्ट्ये देखील आहेत, जी राइडिंगला अधिक आरामदायी बनवते.
advertisement
6/6
कंपनीने नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 तीन व्हिरेएंटमध्ये लाँच केली आहे. ज्यामध्ये बेस व्हेरिएंटची किंमत 1.50 लाख रुपये, मिड व्हेरिएंटची किंमत 1.77 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 1.82 लाख रुपये (सर्व एक्स-शोरूम) आहे, जेणेकरून ग्राहक त्यांच्या आवडी आणि बजेटनुसार सर्वोत्तम मॉडेल निवडू शकतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
कॉलेजला जाण्यासाठी Royal Enfield ची कोणती बाइक बेस्ट? घ्या जाणून किंमतीसह फीचर्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल